तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

पालम तालुका स्तरीय पाक कृती स्पर्धा संपन्न

अरुणा शर्मा


पालम :- गट साधन केंद्र पालम यांच्यामार्फत पालम तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा दि. 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशाला पालम येथे दुपारी एक वाजता ही स्पर्धा भरवण्यात आली. यावेळी तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून तीन याप्रमाणे 27 स्टॉल लावण्यात आले. यावेळी गट शिक्षणाधिकारी बि.डी.ढवळे, मुख्याध्यापक एस.जी. सरोदे, केंद्रप्रमुख एकनाथ नागरगोजे, मारुती टाक, चव्हाण बिडकर, सदाशिव स्वामी व गट साधन केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी हा कार्यक्रम करण्याचा उद्देश बि.डी. ढवळे यांनी सांगितले कि तालुक्यातील चांगल्या दर्जाचे शालेय पोषण आहार, शिजवावे, त्यात सर्व जीवनसत्त्वे विद्यार्थ्यांना मिळतील अशा बेताने  प्रत्येक वस्तू तयार करावी आणि मुलांना सकस आहार कसा मिळेल याची काळजी घ्यावी तसेच परिसर स्वच्छ ठेवून आपले स्वयंपाकगृह कसे स्वच्छ राहील याची सर्व स्वयंपाकीने  काळजी घेणे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. परीक्षण केल्यानंतर प्रथम येनाऱ्या संघस तीन हजार रुपये, द्वितीय दोन हजार रुपये आणि तृतीय 1000 रुपये अशा प्रकारचे बक्षिसाचे वितरण व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले यावळी सर्व स्टॉलची परीक्षण करण्यात आली या स्टॉलमध्ये वेगवेगळे घटक बनवण्यात आले यावेळी सोयाबीन चिवडा गुळ शेंगदाणे चिक्की लाडू राजगिऱ्याचे लाडू मोड आलेली मटकी सेच विशेष म्हणजे राजगिर्‍याचा चिवडा गुळ तसेच पापड्या आणि चकल्या  स्पर्धेमध्ये खाद्य  प्रर्दशनात मांडण्यात आले.या वेळी परीक्षण हराळे, सूर्यवंशी, राऊत, बाबर यांनी परीक्षण परीक्षक म्हणून काम पाहिले.

No comments:

Post a Comment