तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

अंबाजोगाई च्या पर्यटनासाठी व सुशोभिकरणासाठी निधी द्या :- अक्षय भुमकर (पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली मागणी)अंबाजोगाई(प्रतिनिधी ):-  अंबाजोगाई  शहर हे ऐतिहासिक सांस्कृतिक शहर म्हणुन ओळखले जाते या शहराचा इतिहास पाहिल्यास अनेक संत कवीची भुमी व पर्यटन स्थळ म्हणुन ओळख आहे याच भुमीत.
मराठी भाषेचे अद्यकवी
मुकुंदराजस्वामी महाराज यांची समाधी असुन येथील परिसर हा निसर्गरम्य व हरिभरीत असल्याने त्या ठीकाणी पर्यटकांची सतत गर्दी असते परंतु त्या ठीकाणच्या परिसराचा विकास हा अनेक दिवसांपासुन वंचित असुन त्याठीकाणी पर्यटकांची गैरसोय मोठ्याप्रमाणात होत असुन येथील परिसाचा मोठ्या प्रमाणात विकास करावा व पर्यटकांसाठी सोई सुविधा उपलब्ध करून पर्यटनस्थळ व परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे यासाठी पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी मंजुर करून द्यावा अशा मागणीचे पत्र मुंबई येथे आदित्य ठाकरे यांना युवासेना केज-अंबाजोगाई विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी दिले आहे व.
यादव कालीन ९-११ व्या दशकातील हेमाडपंथी सकळेश्वर (बाराखांबी) मंदीराची पडझड झालेला असुन येथील महादेव मंदीर उभारण्यासाठी व डागडुजी करण्यासाठी तसेच पुरात्तव विभागाने उत्खनन केलेल्या यादव कालीन मुर्ती जतन करण्यासाठी वास्तुसंग्रालय उभारून तेथील परिसराचा विकास करून निधी मंजुर करावा या ठीकाणी अनेक पर्यटक हे बाहेरगावाहून येत असतात त्या ठीकाणी कसल्याही प्रकारची सुविधा रस्ते,लाईट खांब बसवण्याची व्यवस्था नाही ती करण्यात यावी व त्या ठीकाणी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ होईल व पर्यटकांची अजुन गर्दी त्या ठीकाणी वाढेल व पुरातन वास्तुसह शहराची पर्यटन स्थळ म्हणुन वेगळी ओळख निर्माण होईल असे मत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे केलेल्या चर्चेत व पत्राद्वारे विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी मांडले
तसेच.
पुरातन हत्तीखाना (जैन लेण्या) ह्या याच परिसरात असुन त्या ठीकाणी ही पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात परंतु तेथील दोखरेखेसाठी सुरक्षा रक्षकाची अत्यंत गरज असुन त्या ठीकाणच्या वास्तुची पडझड होत असल्याने वास्तुचे नुकसान होत असुन त्या वास्तुची व परिसराची डागडुजी करावी त्या साठी निधी मंजुर करवून द्यावा व त्या ठिकाणीच परिसर निसर्गरम्य करून विविध वृक्षांची लागवड करण्यात यावी व येथील परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणुन विकास करण्यात यावा या साठी निधी मंजुर करून द्यावा  जेने करून या अंबाजोगाई शहराचा ऐतिहासीक सांस्कृतीक बाबींचाही पर्यटकांवर माहितीच्या व इतिहासाच्या काणाकोपर्यात या अंबाजोगाई शहराचे नाव लौकीक होऊन एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणुन महाराष्ट्रात उदयास येईल असे युवासेना  विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांना कळवले असुन आदित्य ठाकरे साहेबांनी ही त्या साठी अनुकुलता दाखवली असुन या मागणीसाठी पुर्ण प्रयत्न करण्याचे सांगितले या वेळी अंबाजोगाई शहरास पर्यटनस्थळ बणविण्यासाठी व त्या साठी लागणारा निधी मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करून प्रयत्नशील राहु असे युवासेना केज/अंबाजोगाई विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी तेजन्यूज हेडलाईन्स शी सांगितले.

No comments:

Post a Comment