तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

परळी अंनिसच्या शाखा अध्यक्षपदि जी.एस. सौंदळे तर कार्याध्यक्षपदि शौकत पठाण यांची निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळी च्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जी.एस.सौंदळे कार्याध्यक्ष शौकत पठाण तर उपाध्यक्षपदी दासु वाघमारे यांची निवड करण्यात आली.

अंनिस चे बीड जिल्हा अध्यक्ष प्रदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चे राज्य सहकार्य वाहक प्रा. मनोहर जायभाये यांच्या मुख्य उपस्थितीत दि.26/02/2020 रोजी जिजामाता गार्डन येथे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी विकास वाघमारे यांनी मागील वर्षभरातील अहवाल सादर केला.
या प्रसंगी जिल्हा कार्यकारणी वरील प्रा. विलास रोडे, वैजनाथ कळसकर यांनी शहरातील उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर केली
प्रधान सचिव -विकास वाघमारे,उपाध्यक्ष-रणवीर चक्रे, कायदेविषयक सल्लागार-अॅड. बुद्धरत्न उजगरे, विविध उपक्रम- नवनाथ दाणे, वैज्ञानिक जाणीवा- भैय्यासाहेब आदोडे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाहक- प्रा. दशरथ रोडे व शंरण मस्के, वार्तापत्र विभाग-अशोक मुंडे, संस्कृतिक अभिव्यक्ति-रानबा गायकवाड, प्रकाशन वितरण- राहुल घोबाळे, युवा कार्यवाहक-महादेव आजले व योगेश मुंडे, महिला कार्यवाहक सुकेशनी नाईकवाडे रॉय, प्रशिक्षण कार्यवाहक-ब्रह्मानंद कांबळे व आदेश पैठणे, निधी संकलन-अनंत इंगळे, मानसिक आरोग्य-गोपाळ आघाव, जातीअंत प्रकल्प-संजिब राॅय, मिडीया व्यवस्थापन बाबा शेख आदींची निवड करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शक प्रेमनाथ कदम रानबा गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment