तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

परळीत स्वच्छता सभापती किशोर पारधेंच्या दालनात तक्रार निवारण कक्ष नव्यान सुरु


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती किशोर पारधे यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. स्वच्छता बाबतीत छोट्या मोठ्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी आपल्या सभापती कार्यालयाच्या दालनातच तक्रार निवारण कक्ष नव्यान सुरु केला आहे. अवघ्या 48 तासात स्वच्छता बाबतीतल्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार असल्याचे सभापती किशोर पारधे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले. 
                          परळी नगर परिषदेचे स्वच्छता सभापती यांनी आपल्या शहरातील स्वच्छता बाबतीत योग्य ते नियोजन करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात सभापती दालनात तक्रार निवारण कक्ष निर्माण केला असुन या कक्षात एक नोंद रजिस्टर आणी तीन प्रति असलेले नोंद बुक ठेवण्यात आले आहे एक प्रत तक्रारदाराला आणी दोन प्रति संबधित स्वच्छता विभागातील नियोजन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. स्वच्छता संबंधित कसलीही तक्रार असेल तर नागरिकांनी न.प.कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवावी आणी 48 तासात सोडवणुक करुन घेण्यासाठी जागृत नागरिकांनी या कामी मदत करुन न.प.च्या स्वच्छता विभागाला सहकार्य करावे असे नम्र आवाहन ही सभापती किशोर पारधे यांनी केले आहे. 
              या संबधि अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा - सभापती किशोर पारधे 9423472442, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे 9822245856, स्वच्छता निरिक्षक श्रावण घाटे 8208603314, शंकर साळवे 9881839783 यांच्याशी संपर्क करावा.

No comments:

Post a Comment