तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

मराठी भाषा दिन विशेष


शब्दांकन : बाळू राऊत
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी!"
कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने लेखन केले.२७ फेब्रुवारी १९१२ – पुण्यात येथे जन्म, १९१९- २४ –  प्राथमिक शिक्षण – पिंपळगांव बसवंत, १९२४ – २९ –  माध्यमिक शिक्षण – नाशिक, १९३४ – बी ए परिक्षा उत्तीर्ण (मराठी इंग्रजी
मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला
कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही दिनांचे औचित्य साधून मराठी मोळी प्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी ‘फोन कॉल’ करत असतो . दहाही वेळा आपण संभाषणाची सुरु वात ‘हॅलो..!’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर?  म्हणजेच ‘नमस्कार!’ या शब्दाने आपण संवादास सुरु वात केली तर? त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.
 आपण आपल्या ‘मोबाइल’वरून किमान १०-१५ तरी लघुसंदेश (एसएमएस) दररोज पाठवतो. ते सगळेच अर्थातच इंग्रजीतून असतात किंवा इंग्रजी लिपी आणि मराठी शब्द अशा पद्धतीने असतात. आपण दिवसभरात किमान दोन लघुसंदेश (एसएमएस) मराठीतून पाठवले तर? पुन्हा एकदा भाषेवरील प्रेमाबरोबरच माहिती तंत्रज्ञानात मातृभाषेचा केला जाणारा वापर आपल्याबरोबरच समोरच्यालाही समाधान देऊ शकेल. शिवाय आज कित्येकदा घरकाम करणाऱ्या व्यक्ती इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मोबाइलचा परिपूर्ण वापर करीत नाहीत. अशांना मराठीतील लघुसंदेश पाठविले गेल्यास त्यांना आपण मूळ प्रवाहात आल्यासारखे वाटेल.
 एसएमएसची तीच ई-मेलचीसुद्धा! आपल्याला सध्या सर्वच संकेतस्थळांद्वारे ‘फोनेटिक’ (उच्चारावरून शब्द) पद्धतीने अनेक भाषांत ई-मेल पाठविण्याची सुविधा आहे. ठरवून आपण दिवसभरात किमान एक ई-मेल मराठीतून नक्कीच करू शकतो.
 आज आपल्याला सणांच्या सुट्टय़ा हव्याहव्याशा वाटतात. पण भारतीय महिने आणि दिनदर्शिका आपण विसरतो. इतकी की कित्येकदा ‘गुरुपौर्णिमे’च्या तिथीऐवजी आपल्याला ‘वट पौर्णिमे’ची तिथी आठवते. पण चैत्र, वैषाख, ज्येष्ठ.. असे महिने आणि त्या त्या महिन्यांत येणारे सण आपल्याला सांगता येतील का? नवरात्र म्हणजे आश्विन महिना हे किती जणांना माहिती असते? तेव्हा किमान ज्या सणांच्या आपल्याला राष्ट्रीय सुट्टय़ा असतात अशा सणांच्या तरी भारतीय दिनदर्शिकेची आपल्याला माहिती हवी आणि ते त्याच तिथीनुसार बोलता यायला हवेत.
 आपण हल्ली सामान्यपणे महिन्याला किमान एकतरी चित्रपट पाहतोच.. मग तो कितीही ‘टुक्कार’ का असेना! अशा वेळी आपण आपल्या भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर? वर्षांतून किमान दोन मराठी चित्रपट आणि दोन मराठी नाटके आपण नाही का पाहू शकणार? किंवा अगदी मित्र-मैत्रिणींसह जाऊन आपण नाही का मातृभाषेतील कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकणार?
 आपण हल्ली सर्रास पुस्तके वाचतोच. अशा वेळी ठरवून वर्षांकाठी किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणे ही कृतीसुद्धा अशीच सहज जमणारी आणि भाषेसाठी काही केल्याचा आनंद देणारी ठरू शकेल. त्यापुढे जाऊन वाचकांचा एखादा गट तयार केल्यास मराठी पुस्तक खरेदीवर काही विशेष सवलत मिळू शकेल का ते पाहता येऊ शकेल.
 वाढदिवसाला, शुभकार्याला, अभिनंदन करताना भेटवस्तू देण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. अशा वेळी ही भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके/ काव्यसंग्रह/ नाटय़कृती यांचा आपण विचार करायला हवा. एक म्हणजे त्यासाठी आपण स्वत: ती कलाकृती वाचलेली असेल म्हणजे आपोआप वाचक म्हणून आपले भाषेसाठी योगदान होईल आणि शिवाय इतरांना ती वाचायला दिल्याने भाषाप्रसारास- भाषेतील पुस्तक विक्रीस चालना देता येईल.

No comments:

Post a Comment