तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

माऊली संस्थान श्री क्षेत्र चाकरवाडी येथील महा पंगतीसाठी व्यापारी महासंघाची बैठक संपन्न


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ  नगरी व्यापारी महासंघ तथा भावी  वृंद यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी म्हणजे दिनांक 23. 3. 2020 सोमवार रोजी माऊली संस्थान श्री क्षेत्र चाकरवाडी येथे महा पंक्तीचे आयोजनासाठी दिनांक 25. 2. 2020 मंगळवार रोजी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री ज्ञानोबा  माऊली फड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.  सदरील बैठकीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी धान्य स्वरूपात देणगी देण्याचे ठरले. सदरील बैठकीस खालील व्यापारी व भाविक वृंद उपस्थित होते .व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री ज्ञानोबा  माऊली फड,  नंदकिशोर  बियाणी, बंडू शेठ गरुड, बद्रीनारायण बाहेती, सुरेश मुंडे,अखिल   भारतीय वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष  ह.  भ. प. रामेश्वर महाराज कोकाटे, शंकररावजी आडेपवार, विष्णुशेठ देवशेठवार, श्रीनिवास  रुद्रवार, काशिनाथ देशमुख, विजयकुमार गिरी, अविनाश गडदे, महादेव आप्पा फडकरी, माणिकरावजी डापकर, शंकररावजी पेटेवार,  पी. एस. मोरे, नामदेव महाराज गिरी, जोगदंड सर,  यांच्यासह  व्यापारी बांधव व भाविक वृंद  आदी करून उपस्थित होते

No comments:

Post a comment