तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

जिनींगवाल्यांचा आडमुठेपणा शेतकर्‍यांचा कापूस घेताना केला जातो दुजाभाव भाई थावरेंनी पणन महासंघाच्या कार्यालयात कापूस टाकून केला निषेध
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- माजलगाव येथील जिनींगचे ग्रेडर कापूस खरेदी करताना दुजाभाव करतात. व्यापार्‍याचा कसाही कापूस असला तरी तो घेतात मात्र शेतकर्‍याचा कापूस घेत नाहीत. याबाबत गंगाभिषण थावरेंनी आक्रमक पवित्रा घेत कापसाचा टेम्पोच थेट परळीच्या पणन महासंघाच्या कार्यालयासमोर आणुन उभा केला आणि यातील कापूस तुम्ही का घेत नाही? असा सवाल अधिकार्‍यांना विचारत कापूस अधिकार्‍याच्या टेबल वर ठेवून निषेध केला. यावेळी पणन महासंघाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी कापूस खरेदी विक्री सुरू आहे. कापसाची खरेदी करताना ग्रिडर शेतकर्‍यांशी दुजाभाव करतात. मात्र दुसरीकडे व्यापार्‍यांचे लांगुल चालन करत त्यांचा कसाही कापूस असला तरी तो घेतला जातो. गंगाभिषण थावरे यांनी याबाबत आवाज उठवला. माजलगाव तालुक्यातील भोपा येथील जिनींगवरील ग्रीडरचा मनमानीपणा वाढला आहे. खराब कापूस आहे तो घेतला जात नाही असं ग्रेडर म्हणतात. त्यामुळे थावरे यांनी आज थेट परळीच्या पणन महासंघाच्या कार्यालयासमोर कापसाचा टेम्पो नेवून उभा केला. त्याठिकाणी अधिकार्‍यांना जाब विचारत त्यांच्या टेबलवर कापूस ठेवून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत अनेकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment