तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

नायब तहसीलदार गायकवाड यांनी लावली कर्मचाऱ्यांसह दुकानदाराला शिस्त
अरुणा शर्मा


पालम :- काही दिवसापूर्वी तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले नायब गायकवाड यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह  स्वस्त धान्य दुकानदारांना शिस्त लावल्याने तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या नायब तहसीलदार यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
 जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या दृष्टिकोनातून पालम हा तालुका मागास तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात शासकीय  कार्यालयात काम करण्यासाठी कुठलाही अधिकारी येण्याच्या अगोदर  याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाराचा अनुभव  विचारीधीन  करूनच याठिकाणी कामाला येण्याचा विचार करीत आसतो परंतु तालुक्यातील तहसील कार्यालयातील नव्याने  रुजू झालेले पुरवठा अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी तालुक्यातील तहसील कार्यालयातील तलाठी मंडळ, कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील 114 स्वस्त धान्य दुकानदारांना शिस्त लावण्याचे काम केली आहे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणारे धान्य वेळेवर न मिळाल्याने अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहत होते या कार्यालयाचा पदभार घेताच पुढील महिन्याचे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना महिन्याच्या अगोदरच दिल्याने लाभार्थ्यांना वेळेवर धान्यपुरवठा केला जात आहे. वाहतूक ठेकेदाराकडून दुकानदारांना देण्यात आलेला धान्यपुरवठा न देता काही प्रमाणात धान्य कमी देण्याची जी पद्धत होती ती बंद करत पुरवठा विभाग कडून देण्यात येणारे धान्य दुकानदारांना मिळत असल्याने दुकानदात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे केलेल्या कामामुळे तालुक्यातील ा अधिकार्‍याची सर्व स्तरातून कौतुक होताना दिसून येत आहे.

No comments:

Post a comment