तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

परळीतील खोटे व बनावट रिडींगचे देयके विधानसभेत गाजणार !परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी येथील महावितरण कंपनीने प्रत्यक्ष रिडींग न घेता कार्यालयात बसून अंदाजे जास्तीचे खोटे व बनावट रिडींगचे बिल देऊन ग्राहकांची लूट करून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. याप्रकरणी केज विधानसभेच्या आ.नमिता मुंदडा यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला आहे.
       थोडक्यात वॄत असे की परळी विभागात महावितरण कंपनीच्या अधिकारी व रिडींग घेणारे कंत्राटदार यांनी आपसात संगनमत करून परळी शहर व परिसरातील ग्राहकांना अवाढव्य लाईटचे खोटे व बनावट बीले त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा सपाटा लावला आहे.याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर ते एकमेकांकडे पाठवुन चालढकल करीत आहेत.तसेच रिंडीग घेणारे कंत्राटदार यांना पाठिसी घालत आहेत.महावितरणचे संबधित अधिकारी कंत्राटदार यांनी केलेल्या खोट्या व बनावट बीलाकडे दुर्लक्ष करत आहेत व त्यांना गैरव्यवहार करण्यास मदत करीत आहेत.याबाबत परळी येथील अॅड.राधाकिशन गित्ते यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध व कंत्राटदार यांच्या विरुद्ध संभाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.पंरतु पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करून न घेता केवळ तक्रार चौकशीवर ठेवली.याबाबत परळीत अनेक खोटे व बनावट रिडींगचे बिल पाठवुन ग्राहकांची फसवणूक व लुट करण्यात आली.याबाबत वॄतपत्रांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठविला व  भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या कडे तक्रारी  केल्या.परळीत महावितरण कंपनीच्या गैरकारभाराविरुद्ध केज विधानसभेच्या आमदार नमीताताई मुंदडा यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला आहे.त्यामुळे संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांचे व कंत्राटदार यांचें धाबे दणाणले आहेत.संबधित दोषी अधिकारी व कंत्राटदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment