तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे १९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे शानदार उदघाटनवीज ग्राहक व जनतेच्या हितासाठी वीज कंपन्यांचे खाजगीकरण व फ्रेन्चाईसी करणरोखणार - काॕ.मोहन शर्मा

सांगली (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सघंटना विघुत मडंळाच्या निर्मिती पूर्वी तयार झालेली राज्यातील महावितरण,महापारेषण व महानिर्मीती कंपन्यातील सर्वात पहिली व बहुसंख्य वीज कामगार, अभियंते व अधिकारी सभासदांचे प्रतिनिधीत्व करणारी सघंटना आहे.देश व आतंरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेले कामगार व कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचे आवडते भाई ए.बी.बर्धन व काॕ.दत्ता देशमुख यांनी ६० वर्षापूर्वी स्थापन केलेली सघंटना असुन वीज ग्राहक हिताचे सरंक्षण करत वीज कामगार याचे जिवनमान उंचावण्यासाठी सतत ६० वर्ष सघर्ष करत आहे.
सघंटनेचे ञेवार्षिक १९ वे राज्य अधिवेशन सागंली येथे दि.७ फेबुरवारी २०२० रोजी प्रतिनिधी सञाची सुरुवात श्रीमती राजमती भवन,नेमीनाथ नगर सागंली येथे सघंटनेचे अध्यक्ष व आॕल इंडिया ट्रेड युनियन काॕग्रेसचे राष्ट्रीय सचिव,जागतिक कामगार नेते काॕ.मोहन शर्माजी यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन करण्यात आले. यावेळी महापारेषण कंपनीचे कार्यकारी संंचालक (मासं) मा.सुगंत गमरे, रकार्याधक्ष काॕ.सि.एन.देशमुख, सरचिटणिस काॕ.कृष्णा भोयर,अतिरिक्त सरचिटणिस काॕ.महेश जोतराव, महापारेषण कंपनीचे मा.सुधिर वानखेडे महाव्यवस्थापक, सघंटनेचे उपाधक्ष, उपसरचिटणीस,सयुंक्त सचिव, केंद्रीय सदस्य,६०० प्रतिनिधी उपस्थित होते. प्रतिनिधी अधिवेशनात सुरुवात कामगार नेते व सघंटनेचे माजी अध्यक्ष कै.काॕ.ए.बी.बर्धन,काॕ.दत्ता देशमुख,काॕ.शाम केरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व मशाल पेटवुन उदघाटक मा.महापारेषण कंपनीचे कार्यकारी संंचालक (मासं) मा.सुगंत गमरे व सघंटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.महेश जोतराव यांनी स्वागतपर भाषण केले. सरचिटणिस *काॕ.कृष्णा भोयर यांनी प्रास्तविक करतांना सघंटनेचा तिन वर्षाचा ५७ पानाचा अहवाल सादर केला.सोडलेले प्रश्न, प्रलंबित प्रश्न, खाजगीकरण व फ्रेन्चाईसी सघंटनात्मक बाधंणी याबाबत विस्तृत अहवाल सादर केला.
मा.सुगंत गमरे यांनी सबोंधित करताना म्हणाले शेतकरी व कामगार हा देशाचा कणा आहे,त्यांच्या श्रमामुळे देश घडला,आपली सघंटना विघुत मडंळाच्या निर्मिती पूर्वी तयार झाली व गेले ६० वर्ष अविरत वीज कामगार हितासाठी लढत ही बाब अभिमानाची आहे. वीज कंपन्या व कामगार सघंटना यांच्या सयुंक्त प्रयत्नातुन चांगली मेडीक्लेम योजना सुरु आहे.याचे श्रेष्य सुधा आपल्या सघंटनेस आहे.सदया विघुतचे रुपातंर ऊजेत झालेले आहे.आपण सुधा ऊजेप्रमाणे काम करणे गरजेचे आहे.आपल्या सघंटनेने केलेल्या प्रयत्नामुळे चांगली पगारवाढ मिळाली.कामगार व अभियंते यांच्या चांगल्या कामामुळे तिन्ही कंपन्या नफ्यात आहेत.तिन्ही कंपन्यांच्या एकुन महुलाच्या ३०% महसुल कर्मचारी पगारावर खर्च होतो.सदया देशात सार्वजनिक उधोगाचे खाजगीकरण करण्याचे धोरण सुरु आहे.सार्वजनिक उधोग समाज हितासाठी टिकवून ठेवणे गरजेचे आहे.लवकरच महापारेषण कंपनीत आकृतीबंध लागु करण्यात येणार आहे.आकृतीबंध लागु करतांना कामगार याचे हित जोपासले जाईल.अधिवेशना सुभेछा.
काॕ.सि.एन.देशमुख कार्याधक्ष यांनी सघंटना त्मक बाधणी करण्यासाठी आव्हान करत,वीज ही अन्न,वस्त,निवारा बरोबर गरजेचे वस्तू आहे.आपण अधिवेशनात आपल्या प्रश्नावर चर्चा करावी.असे आव्हान केले.
*काॕ.मोहन शर्माजी* सबोंधित करताना म्हणाले कि तिन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात देशातील व महाराष्ट्रातील ऊर्जा उधोगाची स्थिती,सतत होणारी वीज दरवाढ रोखणे करीता उपाय योजना,वीज कंपन्यांचे खाजगीकरण व फ्रेन्चाईसी करण रोखणे,वीज कंपन्यातील ३२००० कंञाटी,आऊट-सोर्सिग व सुरक्षा रक्षक कामगार याचा कायम करण्याचा प्रश्न,तिन्ही वीज कंपन्यातील ४० च्या वर रिकाम्या जागा भरणे,सन २००८ ला राज्य सरकारने मजुंर केलेली पेन्शन योजना लागु करणे, सुधारित विघुत कायदा २०१८ जो विज ग्राहक व वीज कामगार यांच्या हितास बाधा निर्माण करणारा आहे त्याला विरोध करण्यासाठी आदोंलनाची दिशा निश्चित करणे.मयत कामगार वारसाना नौकरीत सामावुन घेणे,महापारेषण कंपनीचा आकृतीबंध तात्काळ लागु करणे,महावितरण कंपनीत कामगार कपात करणारी पुर्णरचना सघंटनेने सुचविलेल्या मागण्या मान्य केल्याशिवाय अबंलबजावणी न करणे,वीज निर्मितीचे बंद संच सुरु करणे,मुब्रा,शिळ,कळवा व मालेगाव विभाग फ्रेन्चाईसी करुन खाजगी भाडंवलदार याना देण्याच्या निर्णया विरोधात करण्यात येणार,वीज कंपन्या वीज ग्राहक व वीज कामगार याचे होणारे प्रचंड अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात येवुन, अधिवेशनात पुढील ३ वर्षाचे धोरण निश्चित करुन नविन पदाधिकारी याची निवड जाहिर करण्यात येणार आहे.

No comments:

Post a comment