तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची सिनेट मेंबरपदी नियुक्ती


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर परळीला बहुमान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
      ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली   परळीच्या सामाजिक, राजकीय शैक्षणिक, सर्वधर्मीय,क्रीडा, कला,अर्थ आदी सर्व क्षेत्रात सक्रियपणे व आपल्या विशेष शैलीने काम करणारे तसेच विकासात्मक कामातून कारकिर्दीत यशस्वीपणे परळीचे नगराध्यक्ष ठरलेले बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची सिनेट मेंबरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर परळीला बहुमान मिळाला आहे.
   परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा  विद्यमान सदस्य बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी यांची शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, सहकार आदि विविध क्षेञांमध्ये भरीव कार्य व एक उपक्रमशील नगरसेवक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा च्या अधिसभेवर (सिनेट) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-2016 च्या कलम 28 पोटकलम 2 खंड Y अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून नियुक्ती करावयाच्या सदस्य म्हणून बाजीराव धर्माधिकारी यांची अधिसभासदस्य पदी निवड करण्यात आली आहे. या बाबत चे नियुक्तीपत्र विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा. साधना पांडे यांनी प्रदान केले आहे. या नियुक्तीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर परळीला बहुमान मिळाला आहे. या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
      दरम्यान या नियुक्ती नंतर प्रतिक्रिया देताना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आलो आहे. विद्यापीठाच्या अधिसभा प्राधिकरणाच्या सदस्य पदी झालेली नियुक्ती आनंददायी असुन या माध्यमातून जी जबाबदारी वाट्याला येईल ती पार पाडण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले तसेच या नियुक्तीबद्दल  ना.धनंजय मुंडे, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे, गटनेते वाल्मिक कराड, सर्व सन्माननीय न. प. सदस्य, सदस्या, मुख्याधिकारी आरविंद मुंडे  आदींचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a comment