तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

रेल्वेताईची जिद्द अन्‌ कोटीची उड्डाणे


 राजकीय चष्म्यातुन जर पाहिले नाही तर कधी कधी प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न निर्माण पडत असेल जर मुंडे भगिनीचा राजकारणात जन्म झाला नसता तर बीड-परळी-नगर रेल्वेचा प्रश्न सुटलाच नसता. हे सत्य आहे की साठ वर्षे अनेकांनी संघर्ष केले. प्रसंगानुसार काहींनी त्यावर राजकारण केलं. मात्र यश कधीच मिळालं नाही. ज्यावेळी जिल्ह्याचा कारभार सत्तेच्या माध्यमातुन पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे या भगिनीच्या हाती आला आणि हा प्रश्न एका फोनवर मार्गी लागला.या प्रश्नासाठी देशाच्या पंतप्रधानाने स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त फोन केला अन्‌ बघता बघता प्रश्न मार्गी लागला.सुदैवाने डॉ.प्रितमताई यांच्यासारखा जिद्द आणि चिकाटीचा खासदार या प्रश्नाचा प्रशासकिय पातळीवर सतत पाठपुरावा करणारा मिळाला. आज जिल्ह्याच्या शिवारात रेल्वे आली आहे.राज्यात सत्तांतर झालं. मग हा प्रश्न रेंगाळत पडेल की काय?असं वाटत असताना लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवल्यानंतर याच प्रश्नाला हातात घेवुन प्रितमताई संसदेत गेल्या.नुकत्याच जाहिर झालेल्या  अर्थसंकल्पातुन त्यांनी साडे चारशे कोटी रूपये या कामासाठी आणले.उर्वरीत कामाला निश्चित प्रगती मिळेल. पण हा प्रश्न जिल्ह्याचा एकही नागरिक विसरू शकत नाही. इतिहास जेव्हा लिहिल्या जाईल तेव्हा प्रितमताई नव्हे तर रेल्वेताई हे नामांतर करून मुंडे भगिनीच्या योगदानाशिवाय पहिलं पान लिहिल्याशिवाय इतिहास बांधताच येणार नाही. 
 बीड-परळी-नगर हा रेल्वेचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा होता. पन्नास-साठ वर्षे या प्रश्नावर अनेकांनी संघर्ष केले. आंदोलन चालवले. जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर यांच्यासारखे आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत. स्व.गोपीनाथराव मुंडे जेव्हा 2009 ला खासदार झाले तेव्हापासुन हा प्रश्न ऐरणीवर आला. रेल्वे बीडला आलीच पाहिजे यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. या कामासाठी राज्य सरकारचा 50 टक्के वाटा अशा प्रकारचा करार स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंडेंनी करून घेतला होता. यातच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि डॉ.प्रितमताई यांची जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झाली. मुंडे भगिनी यांचं जिल्ह्यात येणं खऱ्या अर्थाने भाग्यच होय. पंकजाताई पालकमंत्री झाल्या आणि प्रितमताई खासदार. हा प्रश्न सुटावा हे स्वप्न मुंडेंचं होतं. या भगिनीनं पहिल्याच टप्यात हा प्रश्न हाती घेतला. केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबरोबर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने एका फोनवर या प्रश्नाला मंजुरी दिली. खरं म्हणजे ही ताकद कमी नाही. देशाचा पंतप्रधान बीडच्या रेल्वे प्रश्नावर फोन करतो हे परमभाग्य जनतेसाठी कामाला येतं ते केवळ नेतृत्वाच्या ताकदीमुळे. त्याचं संपुर्ण श्रेय ह्या भगिनींना जातं. खासदार प्रितमताई एक जिद्द आणि चिकाटी असणारं नेतृत्व आहे. त्यांनी सुरूवातीला या रेल्वे प्रश्नाचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आणि परिणाम बघता बघता चार-पाच वर्षात रेल्वे जिल्ह्याच्या शिवारात आली. वास्तविक पाहता कितीही सामाजिक आणि विकासाचे प्रश्न नेतृत्वाने सोडवले तर जनता मागे राहती असे नव्हे.पंकजाताईनं जो विकास जिल्ह्याचा केला तो न भुतो न भविष्यति आता कुणीच करू शकत नाही. तरी पण त्यांना विधानसभेत पराभवाला सामोरे जावं लागलं. प्रितमताइचर्ं नाव खरं तर रेल्वेताई होवुन बसलं. जी गरज जिल्ह्याची होती तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला.तरी पण लोकसभा निवडणुकीत राजकिय संघर्ष झाला.मोठ्या फरकाने निवडुन येणाऱ्या रेल्वेताई 1 लाख 68 हजार मतानी आल्या.कारण राजकारण त्यालाच म्हणतात की प्रसंगानुसार मतदारही चालतात. शेवटी ही लोकशाही आहे. पण कामाच्या पुण्याईमुळे प्रितमताई पुन्हा खासदार झाल्या.उर्वरीत कामाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला.सतत रेल्वे अधिकाऱ्यांच्या   सोबत बैठका घेणं असेल किंवा कामाची पाहणी असेल त्यांचा स्वभाव संयमी असला तरी विकासाच्या प्रश्नावर कडक आहेत, कठोर आहेत यातुन दिसतं. राज्यात सत्तांतर झालं म्हणुन हा प्रश्न मागे पडतो की काय असे अनेकांना वाटलं. मात्र प्रितमताईनं पंधरा दिवसापुर्वीच जिल्ह्यात येवुन रेल्वे कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला आणि काल रेल्वे अर्थसंकल्प जेव्हा जाहिर झ्ााला त्यामध्ये 449 कोटी रूपायाची तरतुद उर्वरीत कामासाठी झाली. निश्चितच कामाला वेग येईल आणि बघता बघता एखाद्या वर्षात झुक झुक गाडी नगरहुन निघुन बीडमार्गे परळीस्थित येईल. राजकारणात काम करताना विकासाची तळमळ असणारं नेतृत्व हवं. मुंडे भगिनींनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्यात ते करून दाखवलं. पुरेपुर फायदा सत्तेचा घेवुन विकासाच्या प्रक्रियेत बीड जिल्हा हा पुढे घेवुन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने पंकजाताई यांनी केलं. पालकमंत्री कसा असावा? जिल्ह्याचं राजकारण कसं करावं? सर्वसामान्य जनता आणि गोरगरीबांचं पालन कसं करावं? विकास करताना कुठल्याही प्रकारचं द्वेषाचं राजकारण न करता गोरगरीबांची सेवा कशी करावी? या सर्व गोष्टी पालकमंत्री म्हणुन पंकजाताईच्या नेतृत्वातुन पुढे आल्या आणि लोकांना दिसल्या. एक दुरदृष्टी आणि जनकल्याणाची ऱ्हदयस्थ भावना त्यांच्याकडे आहे. राजकारणाचा भाग सोडा. मात्र जिल्ह्याच्या सुदैवाने अजुन पाच वर्षे जर पंकजाताईला मिळाली असती तर बीड जिल्हा हा निश्चितच सांगली, साताऱ्याच्या पंक्तीत जावुन बसला असता. पण राजकारण हा ऊन-सावल्यांचा खेळ असतो. कधी कुणाचे दिवस येतील काहीच सांगता येत नाही. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील याचं स्वप्नसुद्धा त्यांना कधी पडलं नाही. पण ते आज पदावर आहेत. संजय बनसोडे जे उदगीरचे आमदार हे राज्यमंत्री होतील असं डोक्यात पण कधी त्यांच्या आलं नसेल. शेवटी राजकारण, क्रिकेट आणि पाऊस या मैदानावर कधी काय घडेल?याचं भविष्य कुणीच सांगु शकत नाही. बाकी काही असले तरी माझ्या जिल्ह्यात रेल्वे आलीच पाहिजे ही भीष्मप्रतिज्ञा करून दिल्ली दरबारात गेलेल्या खासदारांनी खेचुन आणलेला साडे चारशे कोटी रूपायाचा निधी हा या कामाच्या प्रगतीसाठी कमी नाही. राज्य सरकारच्या कराराप्रमाणे त्यांच्याकडुन पण निधी उर्वरीत येवु शकतो. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. राजकारणात एखाद्या नेतृत्वाने प्रश्न धसास लावला तर तो विषय नेतृत्वाच्या भोवती फिरतो. तसंच काही म्हणताना प्रितमताईचं नाव खऱ्या अर्थाने रेल्वेताई ठेवलं तर अतिशयोक्ती वाटणार नाही. त्या होत्या, त्या आहेत आणि त्यांनी केलं म्हणुनच या मुंडे भगिनीला प्रश्नाचं श्रेय जातं. दुसरी बाजु श्रेय घेण्यासाठी सतत राजकारणात धडपडणारी माणसं असतात. फुकट नारळ कुणी देत नाही आणि फोडत नाही. पण कोटीच्या कोटी उड्डाणे घेवुनसुद्धा या भगिनी श्रेय घेण्याच्या भानगडीत कधीच पडत नाहीत. दुसरं जावु द्या. राज्यात सत्तांतर झालं पण पंकजाताईनं जाता जाता बीड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतुन आणलेला 321 कोटी रूपायाचा निधी आताचे सत्ताधारी यांच्याकडुन खर्च केल्या जातं. म्हणुनच कधी कधी या भगिनी राजकारणात नसत्या तर हे प्रश्न्ा मार्गी लागले असते का? ना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात हायवे आले असते? ना पंचेवीस पंधरा मागेल तेवढा आला असता. आताच्या ग्रामविकास मंत्र्याने एक खडकु पंचेवीस पंधरा अजुन तर दिला नाही. भविष्यात पाच पैसे जरी आले तरी परमभाग्य म्हणावे लागेल. असो. रेल्वेसाठी पुन्हा एकदा कोटीची उड्डाणे घेणाऱ्या जिल्ह्याच्या रेल्वेताईच्या कर्तृत्वाला सलाम.

No comments:

Post a Comment