तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

गरिबांचे दुःख डोळ्यासमोर ठेवून रुग्णांची सेवा करावी वसंतराव सिरस्कर
अरुणा शर्मा


पालम :- डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरिबांचे दुख डोळ्यासमोर ठेवून रुग्णावर माफक दरात उपचार करावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर यांनी डॉक्टर सुधाकर गायकवाड यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले. व्यासपीठावर आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, शिवराम पैके, पत्रकार भगवान करंजे, शांतीलाल शर्मा, धोंडीराम कळंबे आदी उपस्थित होते. डॉक्टर सुधाकर बाजीराव गायकवाड यांनी नुकतीच एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा आमदार रत्नाकर गुट्टे पालम कार्यालयात सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमात बोलताना वसंतराव सिरस्कर म्हणाले की डॉक्टरांनी व्यवसायिक न बनता सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कमी दरात रुग्णांना सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे डॉक्टरांनी कमी दरात रुग्णावर उपचार केल्यास गरिबांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे डॉक्टरांनी नेहमीच गरिबांचे दुःख डोळ्यासमोर ठेवून रुग्णावर उपचार करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाला रासपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कुरे, विनायक पौळ, तायरखाँ पठाण, बाळासाहेब कराळे, नवनाथ पोळ, भैय्या सिरस्कर, चंद्रकांत गायकवाड, माणिक गायकवाड, अप्पाराव गायकवाड, संभाजी गायकवाड, माधव वाघमारे, शंकर वाघमारे, अंकुश रोकडे, भारत डोने आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment