तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

शिवरायांचे विचार अंगीकारणे काळाची गरज : दत्तराव पावडे यांचे प्रतिपादनसेलू येथील नूतन कन्या प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी

सेलू, दि.२४ ( प्रतिनिधी ) : छत्रपती शिवरायांची केवळ जयंती साजरी करून चालणार नाही तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे, विचारानुसार आचरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सदस्य दत्तरावजी पावडे यांनी केले.
नूतन कन्या प्रशालेत शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती होते. मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे , पर्यवेक्षक अशोक वानरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने  याप्रसंगी शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या कलाकृतीचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शिवरायांची प्रतिमा चित्ररुपात साकारणार्‍या विद्यार्थिनी बुधवंत वैष्णवी , अनघा शोभणे ,भक्ती जगताप ,मधुबाला शेळके ,देशपांडे धनश्री तसेच मार्गदर्शक श्री मजगे, विभागीय पातळीवरील उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त शिवाजी शिंदे आणि पाककृती स्पर्धेत केंद्रात प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सौ क्षीरसागर ,सौ दगडू ,सौ कायंदे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील अंकिता खेडेकर,  अपूर्वा खेडेकर , संस्कृती  बुरेवार , संध्या जाधव , श्रद्धा खोजे   , अंकिता कटारे या विद्यार्थिनींनी पोवाडा सादर केला. तसेच प्रशालेतील जानकी भाकड  , पूजा राऊत ,ऋतुजा रोडगे, गायत्री कुलकर्णी , प्रतिक्षा  अंभोरे,  तनुजा डोळझाके ,क्षितिजा खजिने यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांची मने जिंकली तसेच प्रशालेतील साक्षी मगर  , मानसी नखाते ,अदिती गोंडगे  , कीर्ती आरदड, श्रावणी उबाळे , श्रद्धा गायकवाड , श्रुती खंदारे  या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले .अध्यक्षीय समारोप  नंदकिशोर बाहेती यांनी केला.  सूत्रसंचालन कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण यांनी केले, तर आभार सीमा सुक्ते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  श्रीकांत नेवरेकर, बाळासाहेब क्षीरसागर सवणे ,पंडित जाधव यांनी परिश्रम घेतले.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a Comment