तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

सीएएच्या समर्थनार्थ "एक पोस्ट कार्ड देशासाठी" उपक्रमाला सुरुवात ; देशभक्त नागरिक परळीतून पंतप्रधान कार्यालयाला ५०००० पोस्ट कार्ड पाठवणार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  केंद्र सरकारकडून नुकताच संमत केलेला सीएए कायद्याच्या समर्थनार्थ देशभक्त परळीकर पुढे सरसावले आहेत.एक पोस्ट कार्ड आपल्या देशासाठी या उपक्रमाला शहरात आज पासून सुरुवात करण्यात आली असून,तब्बल पन्नास हजारांवर पोस्ट कार्ड सीएए कायद्याच्या समर्थनार्थ पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.शहरातील प्रखर राष्ट्रभक्तांकडून या उपक्रमाचे आयोजन केले आहे,देशाचा जवाबदार नागरिकाने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सीएए म्हणजेच (सिटीझन्स अमेंडमेंट अँक्ट) या कायद्याबद्दल काही नागरिक चुकीचा गैरसमज पसरवत आहेत.या कायद्याची जनजागृती बरोबरच या कायद्याच्या समर्थनार्थ तसेच यासारखे अनेक देशउपयोगी निर्णय घेण्यासाठी सरकारला बळ भेटावे म्हणून "मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्ही आपल्या कायद्याचे समर्थन करतो" अशा आशयाचा मजकूर असलेले पोस्टल कार्ड परळी परिसरातील नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात येणार आहेत.या उपक्रमाला आज परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी यावेळी शहरातील देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकूण ५०००० हजार पोस्टल कार्ड या उपक्रमातुन पाठविण्याचा संकल्प असून पहिल्याच दिवशी या उपक्रमाच्या माध्यमातून २५०० पोस्टल कार्ड जमा करण्यात आले असून ते उद्या पोस्टाद्वारे पंतप्रधान कार्यालय दिल्लीला पाठविण्यात येणार आहेत.

No comments:

Post a comment