तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

नागापुर वाण धरणावरील पाणी चोरी रोखण्यासाठी चार विद्युत डि.पी.च खाली उतरविल्या महसुल, पाटबंधारे, नगर परिषद, एम.एस.ई.बी. व ग्रामीण पोलीस ठाण्याची संयुक्त धडक कार्यवाहीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणावर अवैधरित्या विद्युत मोटारी लावुन अनेक शेतकरी पाण्याचा उपसा करत आहेत या पाणी चोरी करणार्‍या शेतकर्‍यांविरोधात महसुल विभाग, पाटबंधारे विभाग, परळी नगर परिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने यापुर्वी दोन वेळेस धरणातील मोटारी काढुन व कार्यवाहीची तंबी देवुनही अनेक शेतकरी पाणी चोरी करतच असल्याचे निदर्शनास आल्याने आज या संयुक्त पथकाने ज्या डि.पी.वरुन या विद्युत मोटारी द्वारे पाणी उपसा होत होता. त्या चार विद्युत डी.पी.च खाली उतरविल्याने आता शेतकर्‍यांना पाणी चोरी करताच येणार नाही. सदरील कार्यवाही तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागापुरच्या वाण प्रकल्पात सध्या परळीकरांना वर्षभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. परळीकरांना वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी वाण प्रकल्पावरील अवैद्यरित्या पाणी चोरी थांबविण्यासाठी महसुल विभाग, पाटबंधारे विभाग, परळी नगर परिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व परळी ग्रामीण पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक परळीचे तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे.या पथकाने यापुर्वी 26 डिसेंबर 2019 रोजी व दि.3 जानेवारी 2020 रोजी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असता पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. पाणी चोरी करणार्‍या 30 ते 35 शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी वाण प्रकल्पातुन काढुन संबंधित शेतकर्‍यांना अवैद्यरित्या पाणी उपसा न करण्याच्या सुचना दिल्या होत्या तर कांही शेतकर्‍यांचे पाईप या पथकाने कट करुन विद्युत मोटार जप्त केली होती. तरीही अनेक शेतकरी पहिल्या सारखेच पाणी चोरी करत असल्याचे प्रशासनाला समजल्या वरून आज बुधवार दि.26 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी या पथकाने मोठी धडक कार्यवाही करून ज्या डी.पी.वरुन विद्युत मोटारी द्वारे हे शेतकरी अवैधरित्या पाणी चोरी करत होते सदरील चार डी.पी.च खाली उतरवुन घेण्यात आल्या. त्यामुळे आता शेतकर्‍यांना पाणी चोरी करता येणार नाही व परळीकरांना येणार्‍या उन्हाळ्यात पाणी पुरेल. या धडक कार्यवाहीचे परळीकरांतुन स्वागत होत आहे.
या पथकात पाटबंधारे विभागाचे बिट प्रमुख आर.एस.मुंडे, परळी नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे, परळी नगर पालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख वामनराव जाधव तसेच नगर पालिकेचे सिद्धेश्वर घोंगडे, बालाजी डहाळे, समाधान समुद्रे, ज्ञानोबा रोडे, भास्कर ताटे, नन्हु चक्रे तसेच महसुलचे नागापुर सज्जाचे तलाठी शेख सलीम, एम.एस.ई.बी.चे उत्तम देवकर व परळी नगर पालिकेचे 15 ते 20 मजुर आदी जवळपास 30 ते 35 जणांच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला होता. दरम्यान वाण धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव असल्याचेे तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment