तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

सामाजिकतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे - परमेश्वर खरात
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २२ _ सामाजिक, शैक्षणिक उपक्रमातूनच महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचू शकतात. यासाठी शिक्षकांबरोबर सामाजिक संस्थांची भूमिका महत्वाची आहे. स्व.माणिकराव काळे पाटील प्रतिष्ठाण सारख्या सामाजिक जाणीव असलेल्या सामाजिक संस्था ग्रामीण भागात कार्यरत असतील तर ग्रामीण भागातून चांगले वक्ते, चांगले अधिकारी आणि कलाकार तयार होवू शकतात. सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने स्व.माणिकरावजी काळे पाटील सामाजिक प्रतिष्ठानचे हे कार्य असून हे कार्य कौतुकास्पद आहे असे मत पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात यांनी व्यक्त केले.
    गेवराई तालुक्यातील वडगाव सुशी येथे शिवजन्मोत्सव व स्व.माणिकरावजी काळे यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानावरुन पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऋषिकेश बेदरे, सरपंच बबनराव औटे, वसीम फारुकी, केंद्रप्रमुख चौधरी, प्रा. रमेश हिंगणे, प्रा.रामहरी काकडे, चंद्रकांत हक्कदार, प्रतिष्ठानचे कार्यवाहक वशिष्ट काळे यांसह आदि उपस्थित होते. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व स्व.माणिकरावजी काळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना शिवजयंतीदिनी मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. पुढे बोलताना परमेश्वर खरात म्हणाले कि, थोर महापुरुषांच्या जयंतीदिनी प्रत्येक संस्थांनी वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक हित जोपासून काम करावे तरच महापुरुषांच्या जयंतीचे सार्थक होवू शकते असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी प्रा.रामहरि काकडे, चंद्रकांत हक्कदार, प्रा हिंगणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर विचार व्यक्त केले. स्पर्धेत जि.प.शाळा वडगांव, जि.प.शाळा सुशी, जि.प.शाळा कवडगांव, जि.प.कें.शाळा बंगालीपिंपळा, रायसिना इंग्लिश स्कूल सुशी, रामेश्वर विद्यालय सिंदखेड, नवभारत इंग्लिश स्कूल चिखली आदि शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. दरम्यान स्पर्धेत परिक्षक म्हणून मयुरध्वज औटे, शिवाजी काळे, सुलेमान शेख, नकुल औटे, गौतम तुरुकमारे, अण्णासाहेब माने, अण्णासाहेब सुरवसे, सौ.प्रतिमा पौळ, कु.गितांजली औटे यांनी कामकाज पाहिले. विजेत्यांसह सहभागी शाळांचा तसेच परिक्षकांचाही प्रतिष्ठाणकडुन सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
      यावेळी परमेश्वर काळे, रामेश्वर काळे, भागवत काळे, श्रीनिवास काळे, महारुद्र काळे, भारत काळे, संदीप काळे, भारत हरिभाऊ काळे, प्रशांत काळे, विष्णु काळे, अशोक काळे, लहुराव औटे, जिमुरध्वज औटे, वाल्मिक कदम, भाऊसाहेब काळे, कालीदास औटे, गोरख नरवडे, राहुल सिरसट, विक्रम कदम, अजित काळे, शिवाजी औटे, सचिन काळे, नवनाथ औटे, अमोल पानखडे, भिमराव जाधव, नारायण औटे, गणेश पौळ, रवि खरात, सोनाजी सुरवसे, चंद्रकांत भोसले, विठ्ठल ढेरे, कल्याण औटे, श्रीमंत कदम, संभाजी औटे, शिवराज औटे, विजय तळतकर, विजय राठोड ,संदिप वारे, काकासाहेब औटे, मंगेश काळे, सतिष काळे, नारायण काळे, प्रफुल्ल औटे, नामदेव पानखडे आदींसह सहभागी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच महीलासह परिसरातील नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मयुरध्वज औटे व भिष्मा घोडके यांनी केले तर शेवटी आभार प्रतिष्ठाणचे कार्यवाहक वशिष्ट काळे पाटील यांनी व्यक्त केले.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment