तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 8 February 2020

परळीत विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.६ - शहरातील विश्वकर्मा मंदिरात आज भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात असलेल्या विश्वकर्मा कारागीर समिती मार्फत या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.भगवान विश्वकर्मा यांना देवतांचे वास्तुकला तज्ञ मानले जाते.त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवांसाठी हस्तिनापूर तसेच रावणासाठी सोन्याची लंका तयार केल्याची आख्यायिका आहे.या नगरांच्या रचनेत,सौंदर्य,अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.

अशा वास्तुशास्त्राचे प्रणेते असलेल्या भगवान विश्वकर्मा जयंतीत शहरातील सुतार, कारागीर, बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेले सर्व घटक सहभागी झाले होते.यावेळी सकाळी प्रतिमापूजन करण्यात आले तद्नंतर कीर्तन,आरती व महाप्रसाद संपन्न झाला.प्रतिमापूजनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, सोमनाथ आप्पा हालगे,अनिल अष्टेकर,टाक यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष सोहनलाल जांगीड,बनवारी वर्मा(उपाध्यक्ष),पांडुरंग साखरे(सचिव), राजेंद्र(पप्पू)शर्मा(कोषाध्यक्ष),राजाभाऊ साखरे(सहसचिव),रामगोपाल चौधरी (सहकोषाध्यक्ष) या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांनी हा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले. तर शाम तपके, नवरतन शर्मा,भीमाशंकर साखरे,विष्णू साखरे,बालासाहेब साखरे,एकनाथ पांचाळ, बालाजी साखरे,पंडीत तपके यांनी मुख्य मार्गदर्शन म्हणून कार्य पाहिले.

No comments:

Post a Comment