तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

बांधकाम कामगार व शेतमजुरांचा मोर्चा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाफुलचंद भगत
वाशिम: प्रतिनिधी- असंघटित बांधकाम कामगार संघटना (आयटक) व महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन च्या वतीने दिनांक5 फेब्रुवारी 2020 रोजी बांधकाम कामगार व शेतमजुरांच्या विविध मागण्यासाठी  भव्य मोर्चा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.  सरकारी कामगार अधिकारी कार्यालय,पुसद नाका, वाशिम येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा काढण्यात  आला.या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर यांचे राज्य सरचिटणीस काॅ. शिवकुमार गणवीर,महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्याध्यक्ष,काॅ. संजय मंडवधरे अमरावती विभागातीय संघटक काॅ. भिमराव गवई यांनी 
 या मोर्चाचे नेतृत्व केले. वाशिम जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करण्यातील अडथळे दूर करावेत,बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून लाभ देण्यात यावे, सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तू संचाचे वाटप तालुकास्तरावर शिबिरे घेऊन करण्यात यावे, बांधकाम कामगारांना घरे देण्याची योजना राबवून ग्रामीण भागात 2 लाख व शहरी भागात साडेचार लाख रुपये अनुदान त्वरित देण्यात यावे,सर्व योजनांचे प्रलंबित लाभ देण्यात यावे,नूतनीकरणातील अडथळे दूर करावे, खऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या साइटवर जाऊन करण्यात यावी, बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्जावर त्वरित कारवाई करून लाभ देण्यात यावे,  आस्थापना मालक, बांधकाम साईट मालक,  शासकीय कंत्राटदार  यांची इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात  नोंदणी अनिवार्य करावी व त्यांना  मजुरांना प्रमाणपत्र देणे अनिवार्य करावे,रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावी.मागेल त्याला काम देण्यात यावे,रोहयोंतर्गत पाचशे रुपये मजुरी देण्यात यावी, शेतमजुरांना वयाच्या 60 वर्षानंतर सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावे, आरोग्य योजनांची अंमलबजावणी त्वरित करावी व मोफत आरोग्य सुविधा शेतमजुरांना पुरविण्यात यावी, घरकुलासाठी शासकीय जमीन देण्यात यावी व ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणेच अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजूरांनाही  दरवर्षी सहा हजार रुपये, निर्वाहभत्ता,अनुदान देण्यात यावे, किमान वेतन नियमित देण्यात यावे, शेतमजुरांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यात यावे,, या प्रमुख मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  मोर्चा मध्ये वाशिम तालुकाध्यक्ष रमेश खिल्लारे,,विभागीय संघटक भीमराव गवई, जनार्धन कुटे,संतोष कुटे, संतोष खराबे,तातेराव कांबळे,लक्ष्मण कांबळे शहराध्यक्ष शेख कयुम शेख बशी,सुखदेव खिराडे 
आदि कार्यकर्ते व महिला वर्ग बहुसंख्येने सहभागी झाले होते.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment