तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

लहान बालकांना खेळण्यासाठी उद्यान द्या:- युवासेनेची मागणी(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

(बंद असलेले बाळासाहेब ठाकरे उद्यान सुरू करा व  योगेश्वरी उद्यानातील दुरूस्ती करा:- अक्षय भुमकर )

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) सांस्कृती शहर म्हणुन ओळखले जाणार्या अंबाजोगाई शहरात योगेश्वरी देवीच्या मंदिरा शेजारी असलेले नगरपरिषदेचे हिंदुह्रदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे हे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासुन बंद अवस्थेत पडलेले असुन या उद्यानाची अवस्था  अतिषय वाईट झालेली असुन त्या ठीकाणी अस्वच्छता वाढलेली बाभळी मोकाट जनावर गहाणीचे साम्राज्याने उकींडा तयार झालेला असुन या उद्यानाकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले असल्याने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले बाळासाहेब ठाकरे हे उद्यान बंद असल्याने उन्हाळा सुट्टीत शाळकरी मुलांना सुट्टा लागतात त्या बाळगोपाळांना खेळण्यासाठी एकही उद्यान नाही ही खुप निंदनीय गोष्ट असुन त्यांनी सायंकाळच्या वेळी खेळायला जायचे कुठे हा मोठा प्रश्न आहे. म्हणुन युवासेनेच्या वतीने  विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर व पदाधिकार्यांनी बाळासाहेब ठाकरे उद्यान  लवकरात लवकर सुरू करावे व योगेश्वरी उद्यानातील खेळणीची दुरूस्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले अाहे.
जेने करून शहरातील अनेक लहान बालक,शाळकरी मुले हे उन्हाळा सुट्यात बागेत खेळण्यासाठी, फिरण्यासाठी, मनोरंजनासाठी येतील परंतु शहरातील मध्यवर्ती ठीकाणी असलेले दोन्ही उद्यान मृत अवस्थेत आहेत हि खुप खेदाची निंदनीय बाब असुन. एकही सुसज्ज उद्यान शहरात नाही लवकरात लवकर बाळासाहेब ठाकरे उद्यान नव्याने नवीन खेळणी बसुन सुरू करण्यात यावे व योगेश्वरी उद्यानातील खेळनीची व महादेवाच्या मुर्तीची दुरूस्ती करून घ्यावी अशी मागणी युवासेना  विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर व अन्य पदाधिकार्यांनी दिली असुन याची दखल १० दिवसांत न घेतल्यास अमरन उपोषणाचा ईशारा हि यावेळी देण्यात आला अाहे. निवेदन देते वेळी युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख अभिमन्यु वैष्णव, शिवसेना शहर समन्वयक अर्जुन जाधव, उप शहर दिनेश उपरे, सर्कल प्रमुख शरद मोटे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment