तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

आष्टी शहरातील व्यावसायिकांचे दुकाने पाडल्याने त्यांना पर्याय जागा उपलब्ध करुन द्या - सुरेश पाटोळे गोरगरीब सुशिक्षित व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ


बाळू राऊत प्रतिनिधी 
आष्टी : शहरात सर्व जाती धर्माचे तरूण व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते.परंतु अचानकपणे गोरगरिबांच्या दुकानावर नगरपंचायतने दुकाने पाडले असून शहरातील काही मोठ्या व्यावसायिकांचे दुकाने तसेच ठेवून गोरगरीबांवर अन्याय केला जात असून नगरपंचायतचा वेगळाच फतवा राबवून सुशिक्षित तरुण व गोरगरिबांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.या व्यावसायिकांचे पुनर्वसन करुन पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असे सामाजिक कार्यकर्ते तथा मानवी हक्क अभियान सामाजिक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुरेश पाटोळे यांनी व्यावसायिकांशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले,

पुढे बोलताना ते म्हणाले की हे व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी शहरात आपला उदरनिर्वाह या व्यावसायांवर चालवत होते.अचानक नगरपंचायतने त्यांच्या व्यावसायांवर हातोडा चालवल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने त्यांचा विचार कोणताच नेता पर्याय व्यवस्था करून देण्याबाबत बोलत नसल्याचे दिसून येत आहे. 
आष्टी शहरामध्ये सर्व जाती धर्माचे तरूण आप आपले व्यवसाय छोटे मोठे दुकाने उभारून  उपजीविका भागवत आहेत. आता नगरपंचायतीने नाली व रस्ते करण्यासाठी सुरुवात केली मात्र छोटे व्यवसायकांचे दुकाने पाडले परंतु त्यांना पर्याय जागा उपलब्ध करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी नंगरपचायतने गांभीर्य लक्षात घेऊन पर्याय जागेची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री,नगरविकासमंत्री,व बीडचे पालकमंत्री यांना भेटून उपासमारीची वेळ आलेल्या व्यावसायिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुरेश पाटोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment