तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

चाळीसफूटी रस्ता-कन्या शाळा रोड जोडणीचा प्रश्न प्रलंबीतच ; पर्यायी मार्गावरही घाणीचे साम्राज्य

परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.10 - परळी शहरातील गंगासागर नगर,कीर्ती नगर,सिद्धेश्वर नगर या भागातुन जाणाऱ्या चाळीस फुटी रस्ता - कन्या शाळा रोड जोडणीचा प्रश्न गेले कित्येक वर्षांपासून प्रलंबितच आहे.या भागातील नागरिकांना पर्यायी मार्गानेच वाहतूक करावी लागत आहे.चाळीस फुटी रस्त्यावर
बांधलेल्या पुलाला कोटीच्या घरात खर्च करूनही काही नगर परिषदेने जागेचे संपादन न केल्याने हा रस्ता कन्या शाळा रोडला अद्यापही जोडला जाऊ शकलेला नाही.तसेच चाळीस फुटी रस्त्याला जोडणाऱ्या पर्यायी मार्गावरही कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.चाळीस फुटी रस्त्यावरील जनतेचा वनवास कधी संपणार असा सवाल युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी यांनी न.प.प्रशासनाला केला आहे.

शहरात विकासकामाचा दावा करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला कन्या शाळा रोड ते चाळीस फुटी रस्ता जोडणीचे काम गेले 10 वर्षांपासून पूर्ण करता आलेले नाही.प्रभाग क्र 5 मधील गंगासागर नगर परिसरातील 40 फूट रोड ते कन्याशाला रोड ला जोडणारा हा पूल गेल्या 10 वर्षा पूर्वी नगर परिषदेने बांधला पण पुढील रस्त्यात राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचे संपादन न झाल्याने हा पूल असून अडचण नसून खोळंबा झाला आहे.या भागात जाण्यासाठी नागरिकांना लांबचा रस्ता वापरावा लागतो.या विषयावर स्थानिक नागरीक संतप्त असून गेल्या अनेक वर्षा पासून जन आंदोलनाच्या माध्यमातुन लढा देत आहेत पण या रस्त्याच्या प्रश्नाबाबत नगर परिषद प्रशासन   झोपेचं सोंग घेतल्याचे पाहायला भेटत आहे.

या भागातील नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्नही मार्गी लागू शकलेले नाहीत.त्यातच चाळीस फुटी रस्ता - कन्या शाळा रोड ला जोडणीचे काम अंदाजीत 10 वर्षांपासून रखडलेले आहे.या भागात जाण्यासाठी नागरिक पर्यायी मार्गांचा वापर करत असतात मात्र या मार्गांवरही घाणीचे साम्राज्य आहे.नालीतील पाणी आणि कचरा या पाऊल वाटेवर आल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आधीच रस्त्या जोडणीच्या प्रश्नावर त्रासलेल्या नागरिकांना पर्यायी मार्गावरही चालणे मुश्किल झाले आहे.या रस्ता जोडणीच्या प्रश्नावर न.प.प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा असे आवाहन युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment