तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

सख्या रे याद तुझी येते या मराठी गीताच्या चित्रीकरणास सुरुवातपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- प्रसिद्ध गीतकार आणि गायक आनंद व्हावळे निर्मित सख्या रे याद तुझे येते या मराठी प्रेम विरह गीताच्या चित्रीकरणास प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक रानबा गायकवाड व परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गीते यांच्या उपस्थितीत नुकतीच सुरुवात झाली.
      या गीताचे चित्रीकरण परळी, बीड.पांगरी, आणि परभणी जिल्ह्यातील काही प्रेक्षणीय स्थळे करण्यात येणार आहे .या गीताच्या चित्रीकरणाचे सर्वात तालुका अध्यक्ष अनंत गिते यांच्या हस्ते करण्यात आली. या गीताची रचना आणि गायन आनंद व्हावळे यांचे आहे . चित्रीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी सिने नाट्यकलाकार प्रशांत तोतला, विकास वाघमारे, रंजीत गोदाम, सदानंद आचार्य ,राजकुमार कसबे, मयुरी गोदाम, सुशील गोदाम, रमेश मुंडे, श्रुती व्हावळे आदी उपस्थित होते
      या गीतामध्ये प्राध्यापक अरविंद व्हावळे आणि अनुराधा व्हावळे यांची प्रमुख भूमिका आहे. तर या गीताचे छायाचित्रण प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर मनोज आलदे यांनी केले आहे. आनंद व्हावळे यांची प्रमुख भूमिका आहे. या गीतास मनीष ठाकूर आनंद व्हावळे यांचे संगीत लाभले आहे .रानबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोरिओग्राफर सिद्धेश्वर इंगोले यांचे आहे तर मेकअप प्राध्यापक धनश्री व्हावळे वेशभूषा विकास वाघमारे यांनी केली आहे. लवकरच हे गीत व्हिडिओ अल्बम स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे.

No comments:

Post a Comment