तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

संत सेवालाल महाराज चौकात आज लागणार भोगपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
संत सेवालाल महाराज जयंती निमित्त शहरातील संत सेवालाल महाराज चौकात सार्वजनिक  भोग लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. 
राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची शनिवार दि. 15  रोजी 281 वी जयंती बंजारा समाज जगभरात साजरी करणार आहे. परळी येथील वैद्यनाथ मंदिरा नजिक असलेल्या संत सेवालाल महाराज  चौकात बंजारा समाजातील सर्व संघटना व पदाधिकारी यांच्या वतीने सकाळी दहा वाजता सार्वजनिक भोग लावण्यात येणार आहे. यावेळी समाजभुषण प्रभाकर राठोड, भाऊराव चव्हाण, काशिनाथ राठोड, पांडुरंग राठोड, सरपंच डि. एस. राठोड, प्रा. आरूण पवार, प्रकाश चव्हाण, वसंत राठोड, परसराम पवार, रामजी जाधव, साहेबराव चव्हाण, रावसाहेब राठोड, पप्पू चव्हाण, विजय पवार, विकास राठोड, श्रीपती चव्हाण विकास पवार, रूषी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास  बंजारा समाजातील सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment