तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

एकदिवशीय सामन्यातील अपयशी संघात भारत प्रथम क्रमांकावर


                      सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. टि-२० मालिका एकतर्फी जिंकल्यानंतर भारताकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु त्यानंतर सुरू झालेल्या तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने व मालिकाही गमावली. या सलगच्या दोन पराभवानंतर भारतीय संघाच्या नावे एक अजब विक्रम नोंदला. मात्र हा विक्रम असा तसा नव्हता की तो कोणत्याही संघाला हवा हवासा वाटेल. या पराभवाने भारतीय संघ वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधीक सामने हरणारा संघ ठरला.
               भारताने आपला पहिला एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामना १३ जुलै १९७४ रोजी खेळला. तेव्हापासून हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत ९८६ सामने खेळले. त्यापैकी ५१३ सामने जिंकले तर ४२३ पराभव हाती लागले. या दरम्यान संघाने दोन विश्वचषक स्पर्धाही जिंकल्या. वनडे सामन्यात ४१८ ही भारताची सर्वोच्य तर ५४ हि निचांकी धावसंख्या आहे.
                  सर्वाधीक पराभव झेलणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान आहे १९९६ च्या विश्वविजेत्या श्रीलंकेचे. .७ जून १९७५ रोजी आपल्या वनडे क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या लंकेने आजवर ८४९ सामने खेळले, त्यातील ३८६ जिंकले व ४२१ गमावले. या प्रकारात अनुक्रमे ४४३ व ४३ ह्या त्यांच्या मोठया व छोटया सांघीक धावा आहेत.
                  या क्रमवारीतील तिसरा संघ आहे पाकिस्तान. ११ फेब्रुवारी १९७३ रोजी आपला पहिला एक दिवशीय सामना खेळणा-या पाकने ९२७ सामन्यांपैकी ४८६ जिंकले तर ४१३ हरले. पाकच्या नावे एका विश्वचषक विजयाची नोंद आहे. ३८९ ही पाकची सर्वोत्तम तर ५४ निचांकी धावसंख्या आहे.
             ५ सप्टेंबर १९७३ रोजी विंडीजने वनडे क्रिकेटचा श्रीगणेशा केला. त्यानंतर सुरुवातीचे दोन विश्वकरंडक पटकावले. या कालावधीत ८१९ पैकी ४०१ सामन्यात विजय व ३७८ मध्ये पराभव पत्करावे लागले. यामुळे या यादीत ते चौथ्या क्रमावर आहेत.

                  ११ फेब्रुवारी १९७३ म्हणजे बरोबर ४३ वर्षांपूर्वी आपल्या वनडे इंटरनॅशनल मिशनला सुरुवात करणाऱ्या न्यूझिलंडने ७७० सामने खेळून ३५० जिंकले व ३७३ हरले. ४०२ या सर्वोच्च धावांबरोबर ६४ निचांकी धावाही जमविल्या.


लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment