तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

माखणी येथील अखंड हरिनाम सप्ताहची काल्याचे किर्तनाने सांगता.


ताडकळस / प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या माखणी ता. पुर्णा येथे अंखड हरिनाम सप्ताहस शनिवार 15 फेब्रुवारी रोजी पासुन प्रारंभ झाला असुन आज शनिवार दि.22 फेब्रुवारी  रोजी  काल्याच्या किर्तनाने सप्ताह ची सांगता झाली.
माखणी (ता. पुर्णा) येथे मागील अनेक वर्षा पासून  श्री संत मोतीराम महाराज यांच्या प्रेरणेतुन अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. सप्ताहाचे हे सत्तविसावे वर्षे असून सप्ताह कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते  7 विष्णु सहस्त्रनाम, 7 ते 10 सामुहिक ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12.30 गाथा भजन, दुपारी 1 ते 4 श्रीमद भागवतकथा, सायं. 5 ते 6 धुपारती  व रात्रौ 9 ते 11 हरि किर्तन व रात्री हरिजागर इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहत संपन्न झाले. भागवतकार ह.भ.प. शिवाजी महाराज बोकारे यांनी भागवत कथा सांगीतली. आज ह.भ.प. नाना महाराज कदम (श्रीगुरु बंकटस्वामी संस्थान नेकनुर, जि.बीड.) यांचे काल्याच्या किर्तनाने सप्ताहची सांगता संपन्न झाली.  दरम्यान ह.भ.प आनंत महाराज बेटकर,  ह.भ.प.माऊली महाराज मुडेकर, ह.भ.प.नाथबाबा ईसादकर, ह.भ.प. सदानंद महाराज फळेकर, ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडी, ह.भ.प. इंद्रजीत महाराज रसाळ, ह.भ.प.गोपाळ महाराज थेटे, ह.भ.प. केरबा महाराज माखणीकर आदी वारकरी सांप्रदायतील प्रख्यात नामवंताच्या हरिनाम किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दि.22 फेब्रुवारी रोजी गावतुन हरीनामाच्या जय घोषात ग्रथराज ज्ञानोश्वरीची भव्य ग्रथदिंडी काढण्यात आली. आज काल्याच्या किर्तने सप्ताहची सांगता झाली.  
मृदंगाचार्य ह.भ.प. रामभाऊ महाराज लोंढे (श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, लोहा), गायकवृंद काशीनाथ महाराज धसाडीकर, मोतीराम महाराज महागावकर व माखणी पंचक्रोशितील भजणी मंडळांनी साथ मिळाली. ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प.कामाजी नवघरे, ह.भ.प.महाजन आवरगंड, ह.भ.प.रंगनाथ आवरगंड माली पाटील आदींनी केले. विनेकरी बबनराव पुरभाजी आवरगंड, सुदाम रामभाऊ आवरगंड, अच्युतराव भोसले, मोतीराम उत्तमराव आवरगंड,  मारोती शेषेराव आवरगंड, नारायण बाबाराव आवरगंड, गोविंद हरीभाऊ आवरगंड, बबनराव दत्तराव आवरगंड, दत्तराव निळेकर, मुरलीधर बापुराव आवरगंड, बालाजी कोंडीबा आवरगंड आदी भजनी मंडळीनी साथ दिली.
गावकऱ्यांच्या वतीने दररोज भोजनाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह सांगता प्रसंगी पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश प्रासादिक भजनी मंडळ, जय शिवराय युवक गणेश मंडळ, जय जिजाऊ दुर्गा महोत्सव युवक मंडळ व माखणी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment