तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

साईबाबा बँकेला 'बँको' पुरस्कारसेलू (जि.परभणी) : जिल्ह्यातील नामंकित बँक म्हणून परिचित असलेल्या सेलू ( जि.परभणी ) येथील साईबाबा नागरी 
सहकारी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील २०१९ चा ब्लू रिबन   बँको पुरस्काराने मंगळवारी ( ४ फेब्रुवारी ) सलग पाचव्यांदा सन्मानीत करण्यात आले.
सायंकाळी सात वाजता रॉइ रिसोर्ट गोवा येथे हा सोहळा संपन्न झाला. 
रूपये ५० ते १०० कोटी ठेवी असलेल्या श्रेणीनुसार निकषाची पूर्तता केल्याबद्दल बँकेला या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
यावेळी सेंट्रल बँकचे निवृत्त रिजनल ऑफीसर व परीक्षक 
भागवत वंशव, बँकोचे अशोक नाईक, अविनाश शिंत्रे यांच्या हस्ते साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संचालक कैन्हैय्यालाल बालचंदानी, दत्तात्रय आंधळे राजेंद्र आडळकर, पवन आडळकर, ॲड भगवान
शिरसाठ, शेख इम्रान, संदीप आडळकर, सुनील आडळकर मुख्य कार्यकारी अधिकारी
रामराव लाडाने आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल ग्राहकांतून अभिनंदन व्यक्त होत आहे.

फोटो ओळी :

सेलू ( जि.परभणी ) येथील साईबाबा नागरी 
सहकारी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील ब्लू रिबन बँको पुरस्काराने मंगळवारी सलग पाचव्यांदा गौरविण्यात आले.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a Comment