तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

संतसेवालाल महाराज यांची जयंती साजरी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी वैजनाथ येथे बंजारा समाजातील महान संत सेवालाल महाराज यांची जयंती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे परळी भूषण साहेबराव फड उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी शाळेतील सहशिक्षक प्रकाश गिते यांनी संत सेवालाल महाराज यांची माहिती दिली
बंजारा समाजातील समाज सुधारक संत सेवालाल यांची जयंती झाली. त्यांनी समाजाला क्रांतिकारी विचारांचे दिलेले बोल वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. संत सेवालाल यांनी दिलेल्या सेवाभावाची शिकवण बंजारा समाजाने आपल्या कंठात गीतांच्या रूपाने जपून ठेवली. त्याविषयी...
गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे माेठे संत हाेऊन गेले. संत सेवालाल महाराजांचा जन्म माघ कृष्ण पक्ष साेमवार, दि. १५ फेब्रुवारी १७३९ राेजी बंजारा कुटुंबामध्ये गुलाल डाेडी तांडा, ता. गुत्ती, जि. अानंदपूर (अांध्र प्रदेश) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व अाईचे नाव धरमणी हाेते. बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची गाेणी वाहण्याचा हाेता. भीमा नाईकांना चार पुत्र हाेते. सेवालाल (सेवाभाया), बद्दू, हप्पा, भाणा यांच्यापैकी सेवालाल ज्येष्ठ हाेते. सुरुवातीपासून ते विरक्त स्वभावाचे हाेते. त्या काळी बंजारा समाज निरक्षर हाेता. त्या समाजात अाजही निरक्षरतेचे प्रमाण माेठ्या प्रमाणात अाहे. त्यामुळे सेवालाल महाराजांनी अाजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. माल वाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत हाेता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात अाणल्या. याचबराेबर भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले. अाजही बंजारा समाजात एक भाषा व एक पेहराव टिकून अाहे. अशी माहिती दिली या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते

No comments:

Post a comment