तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गोंधळ कला पथकाची कला सादर
अरुणा शर्मा


पालम :- पुणे येथे 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पालम तालुक्यातील आरखेडच्या गोंधळ कला पथकाने आपली कला सादर करून अनेकांची मने जिंकली. या त्यांच्या कलेमुळे त्यांची सर्वत्र वाहवा होत आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या  " तुळजा भवानी गोंधळी पारंपरिक लोककला संच आरखेड " या नावाने तो कला संच असून या कला पथकात कलावंत म्हणून शिवराम बामणे, बालाजी बामणे, दत्ता बामणे, नारायण बामणे, भागवत बामणे, रुस्तुम नरवडे यांचा समावेश गोंधळ या पथकात आहे. या त्यांच्या यशाबद्दल या लोक कलावंतांचे  आरखेड येथील ग्रामस्थांनी, परिषदेचे अध्यक्ष डॉ.साहेब खंदारे व युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रशासकीय सदस्य डॉ.घ.ना.पांचाळ यांनी या कला पथकाचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment