तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि सावरकरांवर टीका करणारे शिदोरीचे संपादकावर योग्य ती कारवाई व्हावी या करिता आमदार राम कदम यांनी दिले राज्यपालांना पत्र


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच . काँग्रेसच्या 'शिदोरी' या नियतकालिकातून सावरकरांवर टीका करण्यात आली आहे. शिदोरीतील एका लेखात तर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नाहीत माफीवीर आहेत, असं म्हटलं आहे त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ दखल घेत योग्य ती कारवाई सरकार आणि पोलीस प्रशासनाने करावी यासाठीचे पत्र आमदार राम कदम,  यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले.त्यावेळी त्यांच्या सोबत माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक नील सोमय्या, चंद्रकांत मालकार होते.
तसेच या अगोदर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजा बद्दल वक्तव्य केले होते. आणि  त्यांच्यावर तक्रार नोंदवून देखील कारवाई करण्यात आली नाही.
आपण पोलीस प्रशासन आणि सरकार यांना निर्देश देऊन लवकरात लवकर शिदोरीचे संपादक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या अपमानाबद्दल तमाम देशवासियांच्या दुखावलेल्या भावना समजून त्वरित संबधितांवर योग्य ती कारवाई करावी.

No comments:

Post a comment