तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

श्री संत तुकाराम महाराज अनुग्रह दिनानिमित्त खेर्डा येथे कार्यक्रमाचे आयोजन.


प्रतिनिधी
पाथरी:-जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या गुरु अनुग्रहा दिनानिमित्त श्री त्रिंबक महाराज आमले यांच्या वतीने खेर्डा (महादेव) येथे तीनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ०४:०० ते ०६:००  काकडा भजन, सकाळी १०:०० ते १२:०० गाथाभजन, रात्रौ. ०९:०० ते ११:०० हरिकीर्तन व रात्री ११:०० वाजता जागरणाचा कार्यक्रम होईल. मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी श्री.ह.भ. प. मदन महाराज ढगे यांचे सुश्राव्य किर्तन होईल, बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2020 रोजी श्री.ह.भ.प. रामायणाचार्य राजाराम महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन होईल व नंतर  भजन सम्राट संदीपान महाराज तौर व स्वर सम्राट रमेश महाराज कोल्हे यांचा हरिजागर होईल.
गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी १०:०० ते १२:००
श्री.ह.भ.प. गंगाभारती दास साहेबराव महाराज कोठाळकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल. या कार्यक्रमाला मृदंगाचार्य :- मृदंग महामेरू पार्थ पुरत्न सुरेश महाराज पाथरीकर, ताल मुनी उद्धव महाराज डुकरे, बाळु महाराज वाळेकर. हार्मोनियम :- गणेश महाराज तौर शिवणगावकर.
गायनाचार्य :- सर्व श्री ह भ प संदिपान महाराज तौर, रमेश महाराज कोल्हे, बद्री महाराज तौर, नारायण महाराज वाळेकर, अशोक महाराज पुरी, उद्धव महाराज लाडाने, सुमंत महाराज डाके व इतर भजनी मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती श्री त्रिंबक महाराज आमले यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a comment