तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

खलनायक ठरलेले दुसऱ्या वनडेतील खेळाडू


        तीन वनडे सामान्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारत गोलंदाजांच्या निष्क्रीयतेमुळे हरल्यानंतर भारतीय संघ खडबडून जागे होऊन दुसऱ्या सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असे वाटले होते. परंतु अगदी याच्या विपरीत प्रकार न्यूझिलंड विरुध्दच्या दुसऱ्या सामन्यात बघायला मिळाला. मागच्या वेळेस कर्णधाराची नियोजनशुन्यता,  गोलंदाज व क्षेत्ररक्षक पराभवाचे मुख्य खलनायक होते तर यावेळी फलंदाजांनी ही त्यांची साथसंगत करत चुकांचे वर्तुळ पुर्ण करत भारतीय संघ टि -२० मालिका केवळ न्यूझिलंडला हातातोंडाशी आलेले शेवटचे न जिंकता आल्यामुळे जिंकली हे स्वतःच्या गचाळ कामगिरीने पुराव्यानिशी सिद्ध केले. या दुसऱ्या सामन्यातील पराभवामुळे तीन सामन्यांची मालिका भारताने गमावली आहेच पण तिसरा सामना जिंकून न्यूझिलंड टि -२० तील नामुष्कीजन्य पराभवाचे उटणे काढतो का हिच काय ती औपचारीकता शिल्लक आहे.
              दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझिलंडची ७ बाद १९४ अशी अवस्था असताना भारतीय गोलंदाज त्यांना आवरण्यात अपयशी ठरले.परिणामत: न्यूझिलंडने भारताला कोंडीत पकडण्याइतपत धावसंख्या उभी केली. त्यानंतर काय झाले हे आपणास चांगले ठाऊक आहे. तरीही या पराभवाचे खलनायक ठरलेल्या काही महाभागांविषयी येथे जाणून घेऊ की त्यांच्या कोणत्या चुकीमुळे भारताला सामनाच नव्हे तर मालिकेवर पाणी सोडावे लागले.
              न्यूझिलंडच्या पावणेतीनशे धावांचा पिछा करताना सलामीवीर मयंक अग्रवालने धीमी सुरुवात केली खरी पण तिचा त्याला फायदा उठविता आला नाही.पहिल्या सामन्यात ३२ धावा करून पदार्पण बऱ्यापैकी साजरे केले होते, परंतु या सामन्यात अवघ्या तीन धावांवर बेनेटला बळी पडला व संघाला अडचणीत टाकून तंबूत परतला.
             पहिल्या सामन्यात ५१ धावांची चांगली खेळी करणारा कर्णधार विराट कोहली या सामन्यात सुस्तावला. त्याचा फटका संघाला बसला. त्याने केलेल्या १५ धावांच्या संघाला पराभवाच्या खाईत ढकलण्यास पुरेशा ठरल्या. शिवाय न्यूझिलंडचा डाव जेंव्हा आटोक्यात ठेवता येत होता तेथे तो कर्णधार म्हणून कमी पडला. हेही भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.
                भारताचा आघाडीचा व महत्वाचा गोलंदाज जसप्रित बुमराह अजून दुखापतीतून सावरले नसल्याचे जाणवत आहे. कारण पहिल्या सामन्यात वाईड चेंडूची खिरापत वाटणारा हा गोलंदाज दुसऱ्या सामन्यातही किवीज फलंदाजांनी चांगलाच धुतला. सलग तीन सामन्यात त्याची बळींची कोरी राहीलेली पाटी भारतीय संघाच्या अपयशाचे प्रमुख कारण आहे. अनफिट बुमराह फिट होईपर्यंत न खेळणेच संघाच्या व त्याच्या हिताचे ठरेल. अन्यथा त्याच्या मानसिकतेवर दुष्परिणाम होऊ शकतो.
                 या सामन्यात रविंद्र जडेजाने आपल्या अष्टपैलूत्वाची झलक दाखविली खरी. परंतु आपल्या बॅटला त्याने महत्वाच्या क्षणी घातलेली वेसण त्याला खलनायक करून गेली. ७३ चेंडूतील ५५ धावांची त्याची खेळी कागदावर समाधानकारक दिसत असली तरी जेंव्हा मोठे फटके मारण्याची गरज होती. त्यावेळी त्याने मारले नाही. गोलंदाज नवदिप सैनी जोमात असताना जडेजाचे कोमात जाणे संघासाठी घातक ठरले. शेवटचा फलंदाज शिल्लक असताना त्याने समोर मालिका बरोबरीची संधी उभी असताना जबाबदारीने खेळणे गरजेचे होते तेव्हा त्याने बेफिकीरी दाखविली व संघाला नामुष्कीजन्य पराभवाच्या खाईत ढकलले.
                 गेल्या काही दिवसांपासून संघाला स्टंप्सच्या मागे पुढे आधार देणारा लोकेश राहुल यावेळी अतिआत्मविश्वासाचा बळी ठरला. त्याची हिच वृत्ती संघासाठी घातक ठरली. त्याने केलेल्या केवळ चार धावा भारतासाठी पुरेशा नव्हत्या.

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment