तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

महिला अत्याचार ,गुंडगिरीच्या विरोधात खा.प्रितमताई मुंडे रस्त्यावर उतरणार..! बीड जिल्हाधिकारी कार्यलयासमोर उद्या धरणे आंदोलन


बीड (प्रतिनिधी) :- महिला अत्याचार ,गुंडगिरीच्या विरोधात खा.प्रितमताई मुंडे रस्त्यावर उतरणार आहेत. मंगळवारी,दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.  बीड जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सत्तातरानंतर बीड जिल्ह्यात होणारे हे भाजपाचे हे पहिलेच आंदोलन आहे. 
      बीड जिल्ह्यात दि.25 फेब्रुवारी रोजी भाजप पदाधिकारी आणि कार्यकत्यांचे धरणे आंदोलन होणार आहेत. बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वा. खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. या आंदोलनात जिल्हा भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक चालू असतानांच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना  वाढल्या आहेत. हिंगणघाट नंतर राज्यात ठिकठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. 15 ते 20 दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिस यंत्रणेचा आणि कायद्याचा धाक उरलेला नाही. तरुण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासर्व मुद्दयांच्या अनुषंगाने आज होणाऱ्या भाजपच्या धरणे आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment