तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे ... मयंक गांधी देऊळगाव दु. येथे ग्लोबल परळी अंतर्गत 30 लक्ष फळबाग लागवड शुभारंभ कार्यक्रम संपन्न

ताडकळस/प्रतिनिधी शेख शेहजाद

ता. 23, गावाच्या विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे असून सर्व घटक एकत्र आले तर गावाचा विकास निश्चित साध्य होतो. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांनी देऊळगाव दु. (ता.पुर्णा) येथे दि. 23 फेब्रुवारी रोजी केले. ते ग्लोबल परळी अंतर्गत 30 लक्ष फळबाग लागवड शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतीनिष्ठ शेतकरी अँड. गंगाधरराव पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून  कृषिभूषण कांतराव झरीकर, महाराष्ट्र सिंचन सहयोग च्या  माजी उपाध्यक्ष विद्याताई पवार-वाघमारे, अँड. रमेशराव दुधाटे, जि.प. सदस्य श्रीनिवास जोगदंड, प्रयोगशील शेतकरी अमृतराज कदम, प्रताप काळे, पत्रकार अतुल शहाणे, माधवराव अवरगंड, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ भुसारे, भाऊसाहेब भोसले, डॉ. लक्ष्मीकांत रावते आदीची उपस्थिती होती.
या वेळी पुढे बोलतांना  गांधी म्हणाले की, मला देश बदलायचा आहे. त्यासाठी गाव बदलन्याची गरज असुन मी सन 2015 पासुन राजकारण सोडुन सामाजिक कार्याला सुरुवात केली. मागील काळात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असून हि बाब महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. विशेषता मराठवाड्यामध्ये व त्यात परळी मध्ये हे प्रमाण अधिक आहे.  परळी सारख्या दुर्गम व दुष्काळी भागात आम्ही ग्लोबल विकास ट्रस्ट च्या माध्यमातून सर्वप्रथम जलसंधारणातुन पाण्याची उपलब्धता केली व त्यानंतर ह्या पाण्यावर दहा लक्ष फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात केली. सतत प्रयत्नांती या मध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळाले असुन यातुन शेतकऱ्यांना अर्थिक बळकटी तर मिळतच आहे. त्या बरोबरच जगतील सर्वात मोठी समस्या म्हणजे पर्यवरणाचा होणारा ऱ्हास आहे. या वृक्ष लागवडीतुन  पर्यवरण संवर्धना सारखे महत्वाचे काम होत आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,  परळीच्या यशा नतंर आजूबाजूच्या परभणी, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील काही गावामध्ये सुद्धा ट्रस्टने काम सुरू केले आहे. 30 लक्ष फळबाग लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेऊन आम्ही कामाला सुरुवात केली आहे. विविध फळझाडांची चांगल्या दर्जाची रोपे आम्ही सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणार आहोत. माती परीक्षण व तज्ञांचे मार्गदर्शन आमच्या टिम मार्फत केले जाणार आहे. या सर्व फळझाडांची सॅटेलाईटद्वारे पाहणी केली जाणार असुन जागतीक बाजारपेठेवर आमची टिम लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे जास्तीत शेतकऱ्यानी या मध्ये सहभागी व्हावे. शेवटी त्यांनी स्थानिक युवकांनी आपल्या गावातच मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया उद्दोग करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात करण्यात आली. जि.प.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वांगतगीत सादर केले तर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवराचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्षीय समारोम अँड गंगाधरराव पवार यांनी केला.  सूत्र संचलन बळीराम कदम तर  प्रस्ताविक मंचक दुधाटे यांनी केले. कार्यक्रमास गजानन आंभोरे, प्रल्हाद पवार, शेती सेवा ग्रुपचे बालासाहेबहिंगे, मधुकरराव जोगदंड, प.सं. सदस्य माधवराव दुधाटे, उपसरपंच पांडुरंग दुधाटे आदीसह देऊळगाव व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोविंद दुधाटे, सुदाम (आबा) दुधाटे, मोतीराम दुधाटे, शिवाजीराव दुधाटे ( पोलीस पाटील), बळीराम काका दुधाटे, पंढरीनाथ शिंदे, राजू दुधाटे, भगवान माली पाटील, भुजंग दुधाटे, कुंडडलिक दुधाटे, रामेश्वर काका दुधाटे आदीसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या समाजिक कार्यकर्ते विद्याताई पवार-वाघमारे  यांनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शिक्षक बळीराम कदम व ग्रामस्थांच्या पुढाकारातुन होत असलेल्या कामाची करुन रोख स्वरुपात 21 हजार रुपयांचा निधी भेट दिला तर ग्लोबल विकास ट्रस्ट करीत असलेल्या शेतकरी हिताच्या कार्याने प्रेरीत होऊन या संस्थेला पाच लाख रुपयांचा निधी यावेळी जाहीर केला.

No comments:

Post a Comment