तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

वडी अंगणवाडी झाली धुरमुक्त.
प्रतिनिधी
पाथरी:-अंगणवाडयातील खाउ हा चुलीवर तयार करुन वाटप करण्यात येत होता. त्यामुळे पावसाळयाच्या दिवसात ओल्या सरपणा मुळे अंगणवाडयात धुर होउुन. त्यांचा त्रास लहान बालकाना होत होता.  अंगणवाडया धुर मुक्त करण्याचा निर्णय दिनांक २६ जानेवारी  रोजीच्या ग्रामसभेत माझ गांव माझ योगदान उपक्रमातील युवकानी ग्रामसभेला विनंती केली होती. त्या अनुषंगाने ग्रामसभेत ठराव मंजुर करुन ग्रामसेवक शेळगे यांनी तात्काळ अंगणवाडयाना गॅस सिंल्डर व गॅस शेगडी खरेदी करुन दिल्या.  त्यांचे वाटप १२ फेबुरवारी बुधवार रोजी अंगणवाडी क्रं. ३ या ठिकाणी सरपंच व उपसरपंच याच्या हस्ते शेगडी वाटप करुन अंगणवाडी धुरमुक्त केली.
वडी येथील सर्वच अंगणवाडया हया धुर मुक्त झाल्या असुन ग्रामपंचायत कार्यालयाने गांवातील सर्वच अंगणवाडयाना गॅस शेगडी व गॅस सिल्डेंर वाटप गावच्या सरपंच चंदाताई शिवाजीराव कुटे व गावचे उपसरपंच प्रतापराव पंडीतराव शिंदे यांच्या हास्ते   अंगणवाडी ताई यांना वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित वृक्षमित्र आबासाहेब शिंदे, यांच्यासह "माझ गांव माझ योगदान या उपक्रमाचे संकल्पनाकार अप्पा वडीकर, शुभम गोरे, नृसिंग कुटे, मदन कुटे, व अंगणवाडीतील बालक व माता उपस्थित होत्या. सर्व अंगणवाडी ताई, मदतनीस, बालक यांना आनंद झाला.

No comments:

Post a comment