तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

एक वर्षापूर्वी या कामाला सुरुवात; गाढे पिंपळगाव येथील जोड रस्त्याचे काम प्रलंबितपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील जोड रस्त्याच्या कामाला एक वर्षा पुर्वी सुरुवात करण्यात आली. पण मागील चार  महिन्यांपासून हे सुरु झालेले काम पुन्हा रखडले आहे.यामुळे प्रवाशासह गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
                गाढे पिंपळगाव ते बीड राज्य रस्त्याला जोडणारा दोन किलोमीटरचा हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खराब झाला होता.गाढे पिंपळगाव ते पिंपळगाव फाटा या दोन किलोमीटर रस्त्याला जेवढा वेळ लागायचा त्यापेक्षा कमी वेळ पिंपळगाव फाटा ते परळी या पंधरा किलोमीटरला लागत होता. अक्षरशः या रस्त्यावरील अगोदर झालेल्या रस्त्याची खड्डी सुध्दा उखरली होती. त्यामुळे अँटो चालकांसह अनेक नागरिकांना, प्रवाशांना खड्यांमुळे पाटीच्या मणक्याचे आजार बळावले आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतरही जवळपास एक वर्षभर काम पेंडीग पडले होते. एक वर्षापूर्वी या कामाला सुरुवात झाली. मात्र पुन्हा मागच्या पाच महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यावर साफसफाई, खोदकाम करून जवळपास चार महिने होत आले आहेत. गुत्तेदाराने रस्त्यावर फक्त मुरुम टाकून ठेवला आहे. अगोदर एक महिना मोबाईल कंपनीच्या केबलमुळे काम रूकले आता चार महिने झाले रस्त्याचे काम रखडल्याने 'पहिले पाडे पंचावन्न' म्हण्याची वेळ आली आहे. १ कोटी ३५ लाख रुपये या रस्त्यासाठी मंजूर झाले असताना गुत्तेदार का कम करत नाही हा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडला आहे. ऐवढे मोठे बजट असतानाही रस्त्याचे काम का रखडले आहे. या रस्त्याच्या गुत्तेदाराने रस्त्याचे काम दर्जेदार व लवकरात लवकर करावे आमचा त्रास कमी करावा अशी मागणी  गाढे पिंपळगाव येथील रहिवाशांनी केली आहे.

No comments:

Post a comment