तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

कमालच झाली! परळीत एकाच ते हि अर्ध्या रस्त्यावर आमदार व खासदाराचां फंड खर्च.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- परळी शहरातील पद्दमावती गल्ली भागातील  एकाच रस्त्याच्या अर्ध्या रस्त्यावर आमदार
 व खासदार फंड दिला गेल्याचा प्रताप घडला असुन दोन्ही फंडातुन केलेला हा रस्ता चर्चेचा विषय ठरत आहे.

परळी शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे
नगरपरिषदे मार्फत करण्यात येतात त्यात
रस्ता डांबरी करण करायचा का सिमेंट,काँक्रीटचा करायचा हे उपलब्ध फंडानुसार इस्टिमेंट तयार करून व सर्व परवानग्या नियमानुसार घेवुन टेडंर काढुन
सर्व शर्ती,अटी पुर्ण करणाऱ्या कन्ट्रँक्टरला हे काम दिले जाते.तरअनेक वेळा तीन लाखा पर्यंतच्या लहान
बजेट मध्ये होणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी कार्यकर्ते आमदारांना गळ घालुन आमदार फंड घेवुन छोटी,छोटी कामे करतात तर रस्त्याचे बजट पाच लाखाच्या पुढे जाणारे असेल तर ई-टेडंरीग व्दारे खासदार फंडातुन हि कामे केली जातात.मात्र जेंव्हा हे आमदार फंडातुन अथवा खासदार फंडातुन शहरातील रस्त्यांची कामे करायची असतात त्याला नगरपरिषदेकडुन नाहरकत पत्र घेने बंधनकारक असते व झालेली कामे सदोष व गुणवत्तापुर्ण होणे
साठी नगरपरिषदेच्या बांधकाम विभाग व नगरअभियंता यावर देखरेख ठेवुन असतात.या बरोबरच आपल्या मतदारसंघातील ग्रामिण भागात चांगले रस्ते व्हावे,काही विकासात्मक कामे व्हावी या साठी तीन लाखा पर्यंतचा  आमदार फंड अामदार आपल्या कार्यकर्त्यांना देतात तर खासदार आपला
फंड जिल्ह्यात शहरी व ग्रामिण असा भेदभाव न करता विकास कामासाठी आपल्या कार्यकर्त्यांना देतात तर विधानपरिषदेचे आमदार त्यांच्या राज्यात कोठेही आपला फंड जसा देतात तसाच राज्यसभेचे खासदार देशात जेथे विकासकामे आवश्यक आहे तेथे आपला
खासदार फंड देतात व हे नियमानुसार पुर्वापार चालत आले असुन या मागे फक्त
विकासाभिमुख कामे व्हावी हा हेतु असतो.मात्र आज पर्यंत एकाच रस्त्यासाठी आमदार फंड व खासदारांचा
फंड दिला गेल्याचे कुठे घडले नसुन ती कमाल परळीतील पद्दमावती भागातील मंडलेचा मंडपवाले यांच्या घरापासुन पुढे
बरकतनगर रोडला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यासाठी व तोही पुर्ण नव्हे तर अर्ध्या रस्त्यासाठी घडली असुन  काही महिन्यापुर्वी आमदार फंड खर्च केला गेलेल्या रस्त्यावर  पुन्हा त्याच अर्ध्या रस्त्यासाठी पुन्हा खासदार फंड दिला गेला असुन या फंडातुन पुन्हा
 पुर्वी केल्या  गेलेल्या अर्ध्या रस्ताचेच सिंमेटीकरण करण्यात आला असुन या एकाच व तो ही अर्ध्या रस्त्यासाठी दोनदा
नगरपरिषदेने नाहरकत पत्र कसे दिले याची चर्चा शहरात होत आहे.तर परळी शहरात जर असा प्रकार राजरोस होतो तर तालुक्यातील अश्या किती कामावर आमदार व खासदार फंड खर्च केला गेला याची चौकशी बीडचे जिल्हाधिकारी करतील का असा प्रश्न उपस्थिक केला जात आहे.तर पद्दमावती भागातील  अर्धवट रस्ता  आमदार फंड व खासदार फंडातुन केला परतुं उर्वरित अर्धा रस्ता कोण व कधी करणार असे नागरिकातुन बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment