तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

साळेगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्याकेज (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील साळेगाव येथे एका चाळीस वर्षीय तरुणाने घरातील अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

साळेगाव ता. केज येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:०० वा. संतोष डिंगबर पोपळघट वय ४० वर्ष याने पत्राच्या डब्याच्या अडुला लेडीज स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत संतोष पोपळघट हा गावात वेल्डिंगचे काम करीत होता. त्यांच्या पश्चात वृद्द आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजले नसून मयताचा चुलत भाऊ दिनकर दत्तू पोपळघट यांच्या खबरी वरून केज पोलीस स्टेशनला फौजदारी प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment