तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

स्व नितिन महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा


प्रतिनिधी
पाथरी:-येथील स्व नितिन महाविद्यालयात गुरूवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख उपस्थितित प्रा डॉ जे एम बोचरे, प्रा डॉ भारत निर्वळ, प्रा डॉ हरी काळे,प्रा मधूकर ठोंबरे, पत्रकार किरण घुंबरे पाटील यांची  उपस्थिती होती.या वेळी प्रा डॉ गणपती मोरे यांनी वाचनाचे विषय,आशय, मुख्यगाभा विवेचन  पद्धती या बाबी महत्वाच्या असतात. चिकित्सक वाचनातून लेखनाचे सर्व बारकावे उकलतात म्हणून विद्यार्थ्यांनी नेहमी चिकित्सक वाचना कडे लक्ष द्यावे असे ते या वेळी बोलतांना म्हणाले. तर प्राचार्य डॉ राम फुन्ने म्हणाले की मराठी भाषेला भवितव्य असून ती इतिहास जमा होणारी भाषा नसून इतिहास घडवणारी भाषा असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ आनंद इंजेगावकर यांनी केले तर सुत्रसंचालन कु श्रध्दा तारे यांनी तर  कु प्रिया ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमा साठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment