तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

प्रेमविवाह न करण्याची शपथ मुलींनाच का ? चांदूरच्या शपथ प्रकरणावरून पंकजाताई मुंडे यांचा संतप्त सवाल


मुंबई (प्रतिनिधी) :- दि १४ ----   अमरावतीतील चांदुर येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थिनींना 'मी प्रेमविवाह करणार नाही' अशी शपथ देण्याचा विचीत्र प्रकार उघडकीस आल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी 'ही शपथ मुलींनाच का?', असा खरमरीत प्रश्न विचारत या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

'कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची... त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की,  एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देणार' अशा तीव्र भावना पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment