तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

परळी-पिंपळा धायगुडा रस्त्याच्या कामाला दोन दिवसात प्रारंभ


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तीन वर्षापासुन रखडलेल्या परळी ते पिंपळा धायगुडा रस्त्याच्या कामाचा अखेर मुहूर्त लागला आहे. दोन दिवसात या रस्त्याच्या कामास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी मोबाईल क्रेशर व इतर साहित्य बांधकाम साईटवर आणलेले आहे. दरम्यान या कामाचा भूमिपुजन समारंभ होताच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते झाला. या रस्त्यामुळे गेल्या दोन वर्षापासुन वाहन चालकांना व प्रवाशांना होत असलेला त्रास संपणार असून  या रस्त्याला अच्छे दिन येणार आहेत.

या कामाची नव्याने औरंगाबादच्या एका कंपनीला 100 कोटींची निविदा सुटली आहे. राष्ट्रीय महामार्ग लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता गौरशंकर स्वामी यांनी सोमवारी सायंकाळी परळी ते पिंपळा धायगुडा रस्त्याच्या कामाची  पाहणी केली व एजंन्सीच्या कर्मचार्‍यांना काम करण्याच्या सुचना दिल्या आहे. रस्त्याचे काम दोन दिवसात सुरू केले जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता स्वाती यांनी दिली. तसेच खड्डे बुजवून लवकरच रस्त्याचे काम पुर्ण केले जाईल असे त्यांनी अंदाजे 18.50 किलोमीटर लांबी असलेला मौलाना आझाद चौक परळी ते पिंपळा धायगुडा ता. अंबाजोगाई रस्त्याचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. या कामासाठी ए.जी.कंन्स्ट्रक्शन व राजेंद्रसिंग भल्ला इन्फ्रास्ट्रक्चर औरंगाबाद या कंत्राटदारांची नव्याने नेमणूक करण्यात आली आहे.

99.99 कोटी रूपयांच्या या कामास पुर्ण होण्यासाठी अंदाजे 18 महिने एवढा कालावधी अपेक्षीत आहे. रस्त्यामध्ये 10 मीटर रूंदीचा मुख्यक्राँक्रीट रस्ता व दुचाकीसाठी स्वतंत्र 1.5 मीटर रस्ता अशा प्रकारचे अद्यायावत सुविा त्याच बरोबर आवश्यकतेनुसार पथदिवे दुभाजके, बसथांबे, गटारे, शेतीसाठी पाईप लाईन आदींचे ही बांधकाम करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment