तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

रोगमुक्त व तणाव मुक्त जीवनासाठी योग प्रणायाम महत्वाचा- योगशिक्षक बालासाहेब कराड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  रोगमुक्त व तणाव मुक्त जीवनासाठी योग प्रणायाम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन योगशिक्षक बालासाहेब कराड यांनी केले.
परळी तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे आयोजित तीन दिवसीय योग शिबिराच्या समारोप प्रसंगी श्री कराड बोलत होते. बुथवार,दि ५ फेब्रुवारी रोजी आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्यवर्धिनी  केंद्र, शिरसाळा च्या वतीने वतीने व सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा च्या सहकार्याने एक दिवशी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या मागणीमुळे संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था ,लिंबुटाच्या वतीने व सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटाच्या सहकार्याने गुरुवार दि. ६ व शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी असे दोन दिवस या शिबिराची मुदत वाढवण्यात आली.दररोज पहाटे ५.००  ते सकाळी ७.०० या वेळेत हे शिबीर घेण्यात आले.या शिबिरात मार्गदर्शक म्हणून परळीचे  जिल्ह्यातील प्रशिध्द योग शिक्षक बालासाहेब कराड हे उपस्थित होते.या शिबिराचा समारोप शुक्रवार दि.७ रोजी सकाळी ७.०० वा. करण्यात  आला.त्याप्रसंगी श्री कराड बोलत होते.
श्री. बालासाहेब कराड पुढे बोलताना म्हणाले की,सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी मानवाला तणाव मुक्त व रोगमुक्त राहणे आवश्यक आहे त्यासाठी योग प्राणायाम करणे अत्यावश्यक आहे.
महिलांसाठी धनुरासन,कंधारासन,तितली ही योगासणे करणे गरजेची आहेत.तर बालकांच्या शारिरिक व बौध्दिक वाढीसाठी ताडासन,हालासन, धनुरासन,पश्चिमोत्थासन अशी आसणे करणे आवश्यक आहेत.
या व इतर काही योगासनांचे प्रात्यक्षिकसह महत्व श्री.कराड यांनी  या शिबिरात शिबिरार्थिंना  समजावून सांगितले.
योग प्राणायामा सोबतच शुध्द व सात्विक आहार घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे तसेच काही पथ्ये आणि अपत्थे यांचे पालन करणे हेही तितकेच महत्त्वाचेआहे.मानवी शरीर तीन स्तंभावर  उभे असून ते म्हणजे आहार,निद्रा व ब्रम्हचर्य.असेही श्री कराड यांनी यावेळी सांगितले.
 शिबिरार्थी सौ. सुलभा खुशाल कांबळे यांनी या योग शिबिरामुळे ,योग प्रणायामाचे ,आहार,विचाराचे महत्व समजण्यास चांगली मदत  झाल्याचे सांगून,  नियमित योग प्रणायाम करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करूत,असा मनोदय त्यांनी बोलून दाखवला.
           शिबिर यशश्वी करण्यासाठी  सरपंच सुदाम यशवंतराव मुंडे, वर्धिनी मीनाक्षी भागवत मुंडे व सौ.सुलभा खुशाल कांबळे,आशा कार्यकर्ती सौ.अर्चना निवृत्ती केकाण ,आरोग्य कर्मचारी एम.एम.लटपटे, सादग्राम समितीचे कार्याध्यक्ष  विश्वनाथ (आबा) मुंडे,सहसचिव इंद्रमोहन मुंडे, उपाध्यक्ष विश्वंभर दोडके ,सदस्य विकास  ज्ञानोबा दिवटे, मंचक रामकृष्ण मुंडे,बळीराम सोमेश्वर मुंडे, अंगनवाडी कार्यकर्ती सुमेधा श्रीराम मुंडे.  श्री.नागरगोजे   आदींनी  प्रयत्न केले. शिबिरास महिल,पुरूष,लहान मुलं,मुली,वृध्द सर्वांचाच चांगला प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a comment