तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

यशस्वी होणाच्या सर्व परिक्षात यशस्वी सफल


                   दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारीमुंडया चित करून सलग तिसऱ्यांदा व एकंदर सातव्यांदा अंतिम फेरी गाठली. भारताने उपांत्य फेरीत दहा गडयांचा जो विजय मिळविला त्याचा नायक होता संघनायक यशस्वी जयस्वाल ! यशस्वीने भारताची विजय गाथा लिहीताना स्पर्धेतले स्वत: चे व एकंदर सुध्दा पहिले शतक झळकवले. एक शतक, ३ अर्धशतके व एक २९ धावांची नाबाद खेळी जयस्वालच्या यशस्वी खेळाची महती सांगून जाण्यास पुरेशी आहे.
               मुळचा उत्तर प्रदेशातील भदोहीचा रहिवाशी असलेला यशस्वी वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट नगरी मुंबईत आला. त्याच्या काकांनी रहाण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्याला आसरा दिला नाही. परंतु एका जवळच्या नातेवाईकाने त्याला सहारा दिला व तेथूनच सुरू झाली जयस्वालच्या यशस्वी जीवनाची कहाणी. मुंबईत आल्यानंतर अनेक आव्हानांना सामोरे जात यशस्वी ने आपले उद्दीष्ट साध्य करण्यात यश मिळविले. यशस्वीच्या याच कठीण मार्गक्रमणाचा आढावा घेऊ या.
               यशस्वीचे वडील भदोही येथे पाणीपुरीची छोटीसी दुकान चालवायचे तर आई गृहणी होती. क्रिकेटची आवड असलेला यशस्वी त्यांचा सर्वात धाकटा मुलगा. क्रिकेटपटू बनण्यासाठी तो मुंबईला गेला. यशस्वी आपले काका संतोष यांच्या वरळी
येथील घरी गेला खरा पण तेथे दुसरा कोणी राहू शकेल अशी जागाच नव्हती. नंतर संतोषने मुस्लिम युनायटेड क्लबच्या मालकाला तेथे यशस्वीला राहू देण्याची विनंती केली. त्यानंतर तो ग्राऊंड्समनच्या येथे राहुटीत राहू लागला.
                  यशस्वीची ने स्वतः भोगत असलेल्या त्रासाची गोष्ट आपल्या घरी भदोहीला कळू नये याची पुरती दक्षता घेतली. कारण त्याचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न संपून जावूू नये. यशस्वी प्रशिक्षण घेत असताना आपल्या गरजा भागविण्यासाठी आझाद मैदानावर रामलिला दरम्यान पाणीपुरी व फळेे विकू अर्थार्जनही केले. कधी कधी ग्राऊंडसमनसोबत वाद झाल्यानंतर ग्राऊंड मन खाण्यासाठी काही बनवत नव्हता तेेंव्हा त्याला उपाशीपोटीही झोपावे लागत असे.
                  कुटुंबाची आठवण सतत सतावत राहायची. त्यावेळी तो एकटच रडतही बसायचा. रामलिला चालू असताना पाणीपुरी विकून बऱ्यापैकी पैसेही कमवायचा. परंतु तेथे धंदा करत असताना आपल्या क्लबमधील कोणी पाणीपुरी खाण्यासाठी येऊ नये यासाठी देवाजवळ प्रार्थनाही करायचा जेणेकरून त्याला लाजीरवाने व्हावे न लागू. यशस्वी सतत काही ना काही उद्योग करत असायचा. कधी मोठया मुलांसह क्रिकेट खेळायला जायचा व चांगल्यापैकी धावा करायचा व ते मुले त्याला पैसे दयायचे. त्यातूनच त्याचा चालू खर्च भागायचा.
               ज्या क्लबमध्ये यशस्वी खेळायचा तेथे बाकीचे मुले स्वतःचे जेवणाचे डबे घेऊन यायचे तर काहींचे पालक घेऊन यायचे. पण येथे यशस्वीची कहाणी वेगळीच होती. तो राहात असलेल्या राहुटीत त्याचा स्वयंपाक त्यालाच बनवावा लागत असे. तो जेंव्हा जेवण बनवेल तेंव्हाच त्याला खायला मिळत असे. नाश्ता वगैरे हा प्रकार त्याच्या जीवनात त्या काळी नव्हताच. दिवसा खेळ व अभ्यासात वेळ निघून जात असल्याने दिवस धाकायचे परंतु त्याच्यासाठी रात्र कटवणे त्याच्या साठी अवघड जायचे. आईवडिलांची आठवण यायची तेंव्हा तो एकटाच रडत बसायचा.
                सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन व यशस्वी चांगले मित्र आहे.बंगलुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकेडमीत त्यांची मैत्री फुलली. तेथे ते दोघे एकाच खोलीत राहायचे.तेथेच अर्जुनने सचिनशी त्याची ओळख करून दिली. नंतर तो अर्जुनसह घरीही जाऊ लागला. त्या वेळेस यशस्वीच्या गुणवत्तेवर सचिनह
फिदा झाला. त्या दरम्यान सचिनने त्याला आपली बॅटही भेट दिली. इतकेच नाही तर सचिनने त्याला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याच बॅटने खेळण्याचा आग्रहही केला होता.
                  सन २०१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना पाच सामन्यात३ शतके व एका द्विशतकाच्या साह्याने पाचशेच्यायावर धावा केल्या होत्या. इतकेच नाही तर झारखंड विरूद्ध अवघ्या १४९ चेंडूत द्विशतक फटकावले होते. इतक्या कमी चेंडूत द्विशतक बनविणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला.एवढेच नाही तर एका डावात सर्वाधीक (१२) षटकार ठोकण्याचा पराक्रमही त्याने केला.
                  सन २०१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळताना पाच सामन्यात ३ शतके व एका द्विशतकाच्या साह्याने पाचशेच्यावर धावा केल्या होत्या. इतकेच नाही तर झारखंड विरूद्ध अवघ्या १४९ चेंडूत द्विशतक फटकावले होते. इतक्या कमी चेंडूत द्विशतक बनविणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला.एवढेच नाही तर एका डावात सर्वाधीक (१२) षटकार ठोकण्याचा पराक्रमही त्याने केला.
               १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेतही त्याने आपला धावांचा रतीब ओतला होता. याचेच फळ म्हणजे त्याला सन २०२० च्या आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सने दोन कोटी ४० लाखात खरेदी केले. यशस्वीची हिच धडाडी त्याला व संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात घेऊन आली. त्याच्या नेतृत्वात देशाला विश्वविजेतेपद मिळावे. हिच सदिच्छा ! 

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment