तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

मरडसगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणुकीत राकाँ प्रणित पॅनलचे यशप्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, म. मडरगांव ता. पाथरी.  या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन 2019-20ते 2024-25  दि 09 फेब्रुवारी रोजी पार पडली यात राकाँ प्रणित पॅनलचे सर्व तेरा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
यावेळी  सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधीच्या 8 जागासाठी   -13 उमेदवार  व अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती 1 जागेसाठी एकुण 02 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते.  महिला राखीव प्रतिनिधी (2 ) जागासाठी 04 इतर मागावसर्गीय (1 ) जागेसाठी 02 विभा/भज/ (1 ) जागासाठी 02  असे एकुण 26  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपल निशीब आजमावत आहेत.. दिनांक 09/02/20202  रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळीत मतदान प्रक्रिया संपली. एकुण मतदाराची संख्या 309  होती. त्यापैकी 293 एवढ्या  मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मा. मंगेश सुरवसे, सहायक निबंधक प्रशासन श्री. उमेशचंद्र हुसे.  तालुका सहकारी निवडणुक अधिकारी श्री. माधव यादव , कार्यालय अधिक्षीक . श्री. बी .एस. नादापूरकर, जिल्हा निवडणुक कक्ष अधिकारी श्री पठाण, सुनिता गोरे,  आदीच्या नेतृवाखाली , तालूका  सहायक निबंधक  श्री. एम.यु. यादव यांच्या  मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ए.एस. कुलथे तर मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून श्री. सदाशिव ताल्डे, व  श्री. बी. टी. लिंगायत यांनी  कामकाज सुरळीत पार पाडले .यावेळी त्यांना श्री.नवनाथ कोल्हे, श्री एम. आर. लोणीकर, श्री. सोळके के.एन. श्री. नखाते एम. आर.,श्री. डी.डी. सोळंके , एस. एस. गोरे यांच्यासह संस्थेचे सचिव मावली नखाते आदीनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तर मडरसगांव येथील ग्रामस्तानी पोलिसाना सहकार्य करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी मदत केली. सदर निवडणुकीचा निकाल मतदान प्रक्रिया संपल्या नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरडसगांव या ठिकाणी  मतमोजनी करुन निवडणूक निर्णय अधिकारी  श्री. अतुल कुलथे यांनी घोषित केला.
सर्वसाधार कर्जदार प्रतिनिधी म्हणुन  1. श्री.कवडे दत्ता बालासाहेब, 2.  श्री. काळे भिमराव बापुराव 3. सौ. काळे रोहिणी विष्णू .4. श्री. काळे लक्ष्मण वचिष्ठ 5. श्री. काळे विठ्ठल   6. श्री.बिक्कड संपती पाटीलबुवा 7. श्री. शिंदे विलास राधाकिशन 8 .श्री. शिदे श्रीकिशन सर्जराव  विजयी झाले तर महिला राखीव प्रतिनिधी म्हणुन  1. काळे काशिबाई बळीराम  2 . काळे लक्ष्मी  सुखदेव तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणुन .श्री. टाक धर्मराज दामु तर अनुसचित जाती/अनुसचित जमाती प्रतिनिधी म्हणन श्री. भाग्यवत कोडीबा सदाशिव तर वि.जा/भ.जा/वि.मा.प्र. प्रतिनिधी म्हणुन.श्री. चौरे बन्शी केशव  हे विजयी झाले आहेत.
मरडगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत प्रचाराचा चांगला धुराळा उडाला होता. उमेदवारानी निवडणुक निशाणी मतदाराना समजण्यासाठी  अनोखी शक्कल लढवुन निवडणुक निशाणी छत्री लक्षवेधी ठरली होती. सदर निवडणुक लक्षवेधी झाली होती.  त्यामुळे या निकालाकडे तालुक्यातील सर्वच राजकीय पुढाऱ्याच्या  लक्ष लागले होते. विजयी उमेदवार यांचे अभिनंदन ग्रामस्थानी केले. सदर निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी गावातील नवयुवकानी निवडणुक निर्णय अधिकारी यांना सहकार्य केले.

No comments:

Post a comment