तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

अंबाजोगाईतून शालेय विद्यार्थ्याचे अपहरण..


अंबाजोगाई : अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत गेलेल्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची घटना समोर आल्याने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे. सध्या हा विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 

अजय उर्फ बबलू कृष्णा मुंडे (वय १५ वर्षे ८ महिने रा. गांजपूर, ता. धारूर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अजयचे वडील कृष्णा बापूराव मुंडे हे शेतकरी असून मुलांच्या शिक्षणसाठी ते अंबाजोगाईत खडकपुरा भागात किरायाने राहतात. अजय सध्या खोलेश्वर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी म्हणून अजय एका खाजगी अभ्यासिकेत गेला होता. सायंकाळ झाली तरी तो घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन अजयचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ह. प्रकाश सोळंके करत आहेत.

No comments:

Post a Comment