तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

मंगरुळपीर येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
फुलचंद भगत
मंगरुळपीर-येथील योगतपस्वी संत बिरबल नाथ महाराज यांच्या यात्रोत्सव निमित्त दि 13 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी घेतला
यावेळी संतशांती पूरी महाराज,साध्वी सोनाली गिरी ,गोपालनाथ गुरू बालक नाथ, संत योगीनाथ बाबा,बाबू महाराज रहीत सहित, यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच महाआरती झाली यावेळी महिला व पुरुष अश्या दोन लाईन भारी मधून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले संस्थानच्या अध्यक्ष पुष्पाताई रंघुवंशी,सचिव रामकुमार रंघुवंशी, कृष्णा सिंह रंघुवंशी,उत्तम पाटील,  सीताराम दबडे महाराज,प्रा विरेंद्रसिंह ठाकूर, तिवारी महाराज, सुनिल म्हतारमारे,राम पाटील, राजेश खंडेतोड,या दरम्यान यात्रा शांततेत पार पडावी यासाठी ठाणेदार धनंजय जगदाळे, यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सेवादारी मोठया संख्येने उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment