तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

परळीत लक्ष्मी बाल रूग्णालय व क्रिटीकल सेंटरचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते शानदार उद्घाटनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील व तालुक्यातील रूग्णांना लक्ष्मी बाल रूग्णालय व क्रिटीकल सेंटरच्या माध्यमातून डॉ. सोमेश्वर चाटे यांनी अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्याची सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे रूग्णांना चांगल्याप्रकारे उपचार परळीतच मिळू शकतात असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजयजी मुंडे यांनी लक्ष्मी बाल रूग्णालय व क्रिटीकल सेंटरच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

   शहरातील बस स्टँड समोर, भगवान बाबा काँम्प्लेक्स पहिला मजला परळी वैजनाथ येथे डॉ. सोमेश्वर चाटे यांनी लक्ष्मी बाल रूग्णालय व क्रिटिकल केअर सेंटरची सुविधा आजपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना ना.मुंडे पुढे म्हणाले की, आता मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज नाही.आता सर्व सोईयुक्त सेवा अशा ठिकाणी मिळणार आहेत. परळीतील गोर गरीब रुग्णांसाठी अल्पदरात आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी ठेवत डॉ.सोमेश्वर चाटे यांनी परळीत हॉस्पिटल सुरु केले आहे.यामुळे रूग्णांना फायदा होणार आहे. या हाँस्पीटल शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे गट नेते मा.अजयजी मुंडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, शिवाजी सिरसाट, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, डॉ. हाडबे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे, डॉ. सुर्यकांत मुंडे, डॉ. सतिश गुट्टे,   डॉ. बंकट फड, डॉ. संदिप घुगे, डॉ. अजित केंद्रे, डॉ. ज्ञानेश्वर घुगे, डॉ. सौ.रंजना घुगे, डॉ. मधुसूदन काळे, डॉ. अनिल घुगे,  डॉ. अल्काताई गित्ते, डॉ. संदिप गोरे, डॉ. अनिल  लोमटे, डॉ. सचिन गित्ते , सरपंच सुंदर गित्ते, सुधीर मुंडे व वैद्यकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

सेंटर मध्ये 24 तास आय.सी.यु.सेवा, सुसज्ज बाह्यरुग्ण व आंतररूग्ण विभाग, अद्यावत बालरोग  अतिदक्षता विभाग, अद्यावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या काचेच्या पेट्या, कृत्रिम श्वसनयंत्र, कमी वजनाच्या बाळाचा उपचार, कावीळ उपचार, लहान मुलांचे संपूर्ण लसीकरण, शारिरीक व मानसिक सर्वांगिण विकास मार्गदर्शन स्तनपान व बाल आहार मार्गदर्शन, सेंट्रल आँक्सीजन, डिजिटल एक्स-रे, अल्ट्रासोनिक नेब्युलाइझर, स्पेशल रूम व सर्व सोयीनियुक्त जनरल वार्ड, मेडिकल स्टोअर (24 तास) उपलब्ध सुविधांचा लाभ रूग्णांना मिळणार आहे. अद्ययावत व विविध सोयीयुक्त बाल रूग्णालय नव्यानेच परळीकरांच्या सेवेत रुजू झाले. वैद्यकीय क्षेत्रात रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे ब्रीद मानून बालरूपी फुले जोपासना करण्याचे भाग्य मिळणार आहे.   सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत  व्यंकटराव चाटे, सौ. लक्ष्मीबाई व्यंकटराव चाटे, एम.बी.बी.एस., डी.सी.एच.,डी.एन.बी., एम.एन.ए.एम.एस., पी.जी.पी.एन. डॉ. सोमेश्वर व्यंकटराव चाटे, एम.बी.बी.एस. डॉ. सौ.शितल सोमेश्वर चाटे, चि.मेघराज व्यंकटराव चाटे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाराज केंद्रे तर आभार सुधीर चाटे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार डॉ.सोमेश्वर चाटे यांनी शब्द सुमनाने मानले.

No comments:

Post a Comment