तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा पादयपूजन सोहळा

बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई :घाटकोपर  कातळवाडी साखरी आगर येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचा पादयपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला . चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज नितीन गुरुजी यांनी अक्कलकोट येथून स्वामी समर्थ यांच्या मठातील पादुका आणून त्याचे दर्शन स्वामी भक्तांसाठी आयोजित करण्यात आले होते . सिद्धकला तायक्वांडोचे प्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते जयेश वेल्हाळ यांनी या दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते . या सोहळ्याला भाजपा आमदार डॉ विनय नातू , जिल्हाध्यक्ष रामदास राणे , तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे , सचिन ओक , सरपंच सुरेश कदम आदी उपस्थित होते . अर्चना ठाकूर यांच्या सिद्धकला स्वर यात्रेच्या कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली . यावेळी गुहागरच्या कातळवाडीतील शेकडो स्वामी भक्त या सोहळ्याला हजर होते .

No comments:

Post a Comment