तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

परळीत रेल्वे स्टेशन परिसरात नुकतेच जन्मलेले अर्भक काटेरी झाडामध्ये फेकले!



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.24 परळी शहरातील बरकत नगर परिसरात रेल्वे ट्रॅकशेजारी शेजारी सोमवार (दि.24) सायंकाळच्या सुमारास एक दिवसाचे स्त्री जातीचे एक अर्भक आढळून आले.

परिसरातील नागरिकांनी अर्भक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

बरकत नगर परिसरात रेल्वेट्रॅकच्याबाजुला बाळ रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आला. त्यांनी पाहिले असता एका धुडक्यात गुंडाळेलेले अर्भक आढळले. त्यांनी काही पत्रकारांना फोन करुन प्रकरणाची माहिती दिली.

पत्रकारांनी घटनास्थळी जावून बाळाला परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदरील अर्भक हे स्त्री जातीचे असून काही तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फेकल्यामुळे बाळाच्या अंगात काटे रुतले असल्यामुळे प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरु आहे. या घटनेने परळी शहरात एकच खळबळ उडाली असून रात्री उशीरापर्यंत पोलीसात नोंद नव्हती.

No comments:

Post a comment