तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 8 February 2020

सुप्त कलागुणांचा अविष्कार म्हणजे स्नेह संमेलन होय - सौ. विजेता पंडित


सुभाष मुळे
--------------
गेवराई, दि. ७ _ महिला महाविद्यालयाने ग्रामीण भागांतील मुलिंच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादिन सौ. विजेता विजयसिंह पंडित यांनी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनात केले.
     या प्रसंगी कार्यक्रमाच्या उदघाटक सौ. विजेता विजयसिंह पंडित ह्या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँ. कांचन परळीकर ह्या होत्या. व्यासपीठावर सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डाँ. कल्पना घारगे ह्या होत्या. वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या सत्कारा बुके देउन करण्यात आला. उदघाटक म्हणून बोलतांना मा. सौ. विजेता विजयसिंह पंडित म्हणाल्या की, महाविद्यालयाची ओळख तेथील शैक्षणिक उपक्रमांमुळे होत असली तरी महाविद्यालयातील सांस्कृतिक वातावरणाला सुद्धा खूप मोठे महत्त्व आहे. कलाक्षेत्रामध्ये कारकीर्द घडवण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी अशा सांस्कृतिक वातावरणाकडे पाहूनच प्रवेश घेत असतात. त्यांच्या अपेक्षा, ध्येय यांची महाविद्यालयीन जीवनात पूर्ती व्हावी व त्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयांचे योगदान असावे. महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम खरोखरच किती उपयुक्त आहेत . दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन हवे. महिला महाविद्यालयाने ग्रामीण भागांतील मुलिंच्या सुप्त कला-गुणांना वाव देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कांचन परळीकर अध्यक्षीय समारोप करतांना म्हणाल्या की, स्नेहसंमेलनातुन विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना उजाळा मिळतो व विद्यार्थिनींनी सादर करून कला प्रकाराची स्तुती केली. वार्षिक स्नेहसंमेलनास महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी  प्राध्यापक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. लोकनृत्य, कोळी नृत्य देशभक्ति आणी सामुहिक नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
     कार्यक्रमाचे प्रास्तविक सासंकृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ  कल्पना घारगे यांनी केले तर सूञसंचालन डॉ. संगीता आहेर व प्रा. बाबु वादे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. हीरा खरात यांनी  मानले.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment